यात्रा महोत्सवाला सुरुवात

हिमायतनगर(वार्ताहर)महाशिवरात्री निमित्त आयोजित येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या भव्य यात्रा महोत्सवाला ज्ञानेश्वरी व विना पारायण सोहळ्याने सुरुवात झाली आहे.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान शंकराच्या अवतारातील उभी असलेल्या श्री परमेश्वरची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेती नागरताना एका शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रौत्सव साजरा केला जातो. जवळपास पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. माघ कृ.११ दि.१५ रविवारपासून यात्रेला अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरुवात झाली आहे. ग्रंथराज पारायणाचे व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर यांनी सांभाळले असून, त्यांच्या मधुर वाणीत ग्रंथाचे पठण केले जात आहे. पहिल्याचा दिवशी शहरातील शेकडो महिला, पुरुष व बालभक्तानी ज्ञानेश्वरी परायणात सहभाग घेतला असल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यात सामील झालेल्या परायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला आहे. यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच केदार जगदगुरु यांचा इष्टलिंग महापूजा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या मध्यरात्री श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा मंत्रोच्चारात केला जाणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धा, प्रदर्शन व खेळाचे आयोजन करण्यात आले असून, या पर्व काळात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी