कुपोषित अनुसया झाली १७ किलो वजनाची



वाळकेवाडीचे भीषण चित्राकडे सर्वांचे दुर्लक्ष
देशाची वाटचाल जागतिक महासत्तेकडे ...
वाळकेवाडीतील अनुसया मात्र अन्नाला मोहताज..!
 

हिमायतनगर(गोविंद गोडसेलवार)तालुक्यातील आदिवासी बहुल खेड्यातील वाळकेवाडीच्या वागतकर कुटुंबातील अनुसया घरच्या दारिद्र्याने वयाच्या १८ व्या वर्षी सुद्धा अवघ्या १७ किलो वजनाची झाली आहे. अख्खं कुटुंब कुपोषणान हिरावलेली अनुसयाचे तरुणपणही कुपोषणाच्या दाढेतून बाहेर येण्याची धडपडत करीत आहे. 

एकीकडे भारत देश महासत्ता म्हणून उदयास येवू पाहत असताना दुसरीकडे आदिवासी, दलित, आणि ग्रामीण भागातील तत्सम भटक्या जातीतील अनेक मुले अन्नावाचून कुपोषणाच्या दाढेत अडकत चालली आहेत. अशीच एका आदिवासी कुटुंबातील वाळकेवाडीची अनुसया सोमाजी वागतकर या १८ वर्षीय मुलीची कुपोषणाने वाईट अवस्था झाली आहे. 

शहरी भागातील गरोदर मातांची मासिक तपासणी पासून ते बाळंत पणापर्यंत, नवजात बाळाची व आईची आरोग्य विभाग काळजी घेत असल्याने अगदी जन्मताच तीन ते साडेतीन किलो वजनाचे गुटगुटीत बाल जन्माला येऊ लागले आहे. वर्षभरात बाळाचे वजन १५ ते २० किलो वाढविले जाते. परंतु वाळकेवाडीच्या अनुसायाचे १८ वर्षाच्या वयमाना इतकेही वजन नसल्याने कुपोषणाने ती मृत्युच्या दाढेत ओढली जाईल अशी भीती तिच्या कुटुंबियांना वाटत आहे. १०० टक्के आदिवासी (आदिसुचीत) गाव वाळके वाडी स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही विकासापासून कोसो दूर आहे. हिंगोली लोकसभेचे खा.राजीव सातव यांनी वाळकेवाडी या गावास दत्तक घेवून आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. विकास कामांचे अनेक सर्वेक्षांचे काम शासनामार्फत वेगाने चालू आहे. परंतु आरोग्य विभागाचा किंवा इतर कोणत्याही खात्याचा अधिकारी - कर्मचारी आजपर्यंत वागतकर कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी पुढे आला नसल्याने खा.महोदयांनी दत्तक घेतलेल्या गावात अनेक आव्हानांना तोंड देणे आदर्श गाव बनविण्याच्या दृस्तीकोनातून गरजेचे बनले आहे. 

वागतकर कुटुंबातील सोमाजी यांचेही वय वर्ष ६० परंतु मोलमजुरी करून उपजीविका करताना सोमाजीच्या दोन वेळच्या जेवणाचे आबाळ झाल्याने आणि आरोग्याची पुरेशी सोय झाली नसल्याने या वयातच सोमाजीनी आजारपणामुळे भुईला पाठ टेकली आहे. १८ वर्ष वयाच्या १७ किलो वजनाच्या कुपोषित अनुसायाच्या आरोग्यासह उदार निर्वाहाची चिंता डोळ्याची पापणी लागू देत नसल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

एकीकडे महाराष्ट्राचे शासन तर दुसरीकडे राजकीय नेते विकासाचा पेटवत असलेला डंका किती निरर्थक व पोकळ आहे याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हंटल्यास वावगे ठरू नये..? वाळकेवाडी परिसरात सामाजिक, राजकीय, कार्यकर्ते तावातावाने विकासाच्या गप्पा मारताना दिसत असले तरी कमालीच्या हलाकीच्या परिस्थितीत वागतकर कुटुंबाची आस्थेवाईकपने विचारपूस करण्यासाठी कोनही पुढे आला नसल्याने हे कुटुंब अजूनही उपेक्षितच राहिले आहे. दुर्दैवाची गोष्ठ म्हणजे याच गावातील महिला जी.प.सदस्या हि आदिवासी समाजातील असतानाही सदरील कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने जी.प.सदस्यामतदार संघाच्या विकासासाठी किती जागरूक आहेत हे प्रकर्षाने दिसून येते. 

शासनाने किंवा स्वयंसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे करत वागतकर कुटुंबास आधार देण्याची अपेक्षा वागतकर कुटुंब व्यक्त करीत आहेत. तर कुपोषित असलेली अनुसया सशक्त बनवून उज्ज्वल अस्युष्याचे स्वप्न पाहत असून, मदतीची अपेक्षा तिनेही व्यक्त केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी