पाण्यासाठी भटकंती



हिमायतनगर(अनिल भोरे)उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहर व तालुका परिसरात चारा व पाणी टंचाईच्या तीव्र झाला बसण्यास सुरुवात झाली असून, पावसाळ्यात झाली कमी पर्जन्यमानामुळे नदी नाले सप्टेंबर - अक्टोबर मधेच कोरडेठाक पडल्याने मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वन - वन भटकूनही चारा व पाणी मिळत नसल्यामुळे डबक्यातील जमा झालेल्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, दुष्काळाने होरपळलेल्या हिमायतनगर तालुक्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई उग्ररूप धारण केले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकावर आली आहे. प्रशासनाने मंजूर केलेला कृती आराखडा सध्या प्रशासकीय चाक्रव्युव्हातून वाटचाल करत असल्याने टंचाईत मंजूर केलेला आराखडा टंचाई संपल्यावर प्रत्यक्षात राबविला जाणार काय..? असा प्रतिप्रश्न नागरिक विचारीत आहेत. 

मनुष्यप्राणी तहान भागविण्यासाठी हंडाभर पाणी कसेतरी उपलब्ध करेल, परंतु मुक्या प्राण्यांचे काय..? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. परिणामी चारा - पाण्याच्या चिंतेने अनेक पशुपालाकानी लाख मोलाची पशुधन आठवडी बाजारात आणून कवडी -मोल दराने विक्रीसाठी आणता असल्याचे विदारक चित्र सध्या तरी दिसून येत आहे. राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात जनारावाना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सिमेंटच्या हैदाचे टाकी देण्यात आली. परंतु हौदात गात तीन वर्षापासून एक थेंबभर पाणीसुद्धा साठविल्या गेले नसल्याने मुक्या प्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करीत घन पाण्यावर घसा ओला करावा लागत आहे. परिणामी मुक्या प्राण्यांना साथ रोगाच्या आजारला बळी पडण्याची वेळ आली असून, याकडे संबंधितानी लक्ष देवून तातडीने पुरविण्यात आलेल्या हौदात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व खाण्यासाठी चारा डेपोची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. 

पाईप लाईन फुटल्याने टंचाईच्या झळा
एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असताना शहराला पाणी पुरवठा केल्या जाणारी नळ योजनेची पाईप लाईन नडव्याच्या पुलाजवळ गात दोन महिन्यापासून फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याची माहिती संबंधिताना असताना देखील ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पुढार्याकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शहर वासियातून केला जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी