व्हॉलीबॉल चषक स्पर्धेला प्रारंभ

गोदावरी स्पोर्टस्‌ अकॅडमीच्या चौथ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चषक स्पर्धेला प्रारंभ

नांदेड(प्रतिनिधी)येथील गोदावरी स्पोर्टस्‌ अकॅडमीच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चषक स्पर्धा आयोजित करण्यात येते, हे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून 25 संघ सहभागी झाले आहेत. 

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला संघामध्येेे लढत झाली. महिला संघामध्ये नागपूरचे दोन संघ, अकोला,माहूर, नांदेड महिला पोलिस, निर्मल आदी संघामध्ये उत्साहवर्धक लढत झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या संघात मुंबई, आरसीएफ, मुंबई पोलिस, माहूर, वडवना, पुणे, औरंगाबाद, दौंड, लातूर, हिंगोली, अमरावती, नाशिक, शिर्डी, उमरखेड आदी ठिकाणाहून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नावाजलेले खेळाडू सहभागी झाले आहेत. मंगळवार व बुधवारीहे सामने रोज सायंकाळी चार वाजता बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर रंगणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे लाभले तर अध्यक्ष म्हणून पोलिस उपअधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, गंगाधरराव शक्करवार, पत्रकार केशव घोणसे पाटील, महात्मा फुलेचे मुख्याध्यापक अशोक गच्चे, ओरिएन्ट सिमेंटचे ए.जी.एम. व्ही. मुर्लीकृष्णा, उद्योजक बीपीन कासलीवाल, संदीप काला आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोदावरी स्पोर्टस्‌ अकॅडमीचे अध्यक्ष दामोदर राई, उमेश जांगीड, प्रदीप देशपांडे, सूर्यकांत गच्चे, राजू गायकवाड, विजय येरावार, विठ्ठलराव कत्ते, दत्तात्रय घुगे, शिवा मुखेडकर, आदींनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी