रोपटे वाळू लागली...

लाखोच्या खर्चातून लावलेली सामाजिक वनीकरणाचे रोपटे वाळू लागली...

हिमायतनगर(वार्ताहर)सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कामचुकार मजूर सेवक, कर्मचार्यांच्या उदासीनतेमुळे लाखो रुपयाच्या खर्चातून रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली रोपटे वाळू लागली आहेत. यावरून सदर कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे पितळे उघड पडत आहे.

गत वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून हिमायतनगर तालुक्यात झालेल्या सामाजिक वनीकरण विभागातील कामाचा पर्दाफाश होण्यास सुरुवात झाली असून, पळसपूर येथील मजुरांना कामाचा मोबदला मिळविण्यासाठी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागले होते. १५ डिसेंबर रोजी सुरु झालेल्या उपोषणात मजुरांनी बोगस मजूर दाखवून रक्कम उचलली, तसेच प्लैनटेशन कामातही मोठ्या प्रमाणात अफरा -तफर करण्यात आली असून या कामची चौकशी करून खर्या मजुरांना रखडलेली मजुरी देण्याची मागणी करण्यात आली होती. उपोषण सुरु होऊन दोन दिवस लोटल्यानंतर सुद्धा तहसीलदारासह एकाही अधिकार्याने दखल न घेता उलट मजुरानाच ऑनलाईन द्वारे तुमाला मजुरी दिल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे एकही रुपया मिळणार नाही, असे धमकी वजा वक्तव्य करून पिनाटून लावण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही कोणत्याही धमकीला न जुमानता मजुरांनी जवळपास पाच दिवस उपोषण सुरूच ठेवले. दरम्यान सामाजिक वनीकरण अधिकारी, अपहार करते सेवक, संगणक चालक व दलाल मजुरांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. अखेर काही झाले तरी यांचे उपोषण उठत नाही हि बाब लक्षात येताच आणि सदर मजुरांच्या उपोषणाची दखल नवनिर्वाचित आमदार महोदय घेण्यासाठी येणार आहेत. असे समजताच काही राजकीय दलालांना हाताशी धरून उपोषणात ढवळाढवळ केली, आणि  काही मजुरांना आर्थिक देवान घेवाण करून उपोषण मागे घेण्यास भाग पडले असे अजूनही मजुरीपासून वंचित असलेल्या काही मजुरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 

या संपूर्ण उपोषणाचा वृत्तांत अनेक वर्तमान पत्रातून येताच वर्षानुवर्ष एका खाजगी मजूर सेवकाकडे ठेवलेली पोस्टातील खाते पुस्तक(पासबुक) तातडीने मजुरांना घरपोच देण्यात आले. परंतु पासबुक पाहताच अनेक मजुरांना आश्चर्याचा धक्काच बसला असून, मजुरीच्या मोबदल्यासाठी उपोषण करणाऱ्या मजुरांच्या घामाचा दाम सामाजिक वनीकरण अधिकार्यांनी तापल खात्याच्या  अधिकार्यांना हाताशी धरून परस्पर उचलला आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, हे प्रकरण हळू हळू आता वेगळ्या वळणावर जात आहे. शासनाच्या दफ्तरी लाखोचा खर्च दाखवून स्वतःचा खिसा भरण्याचा उद्योग तत्कालीन व विद्यमान सामाजिक वनीकरण अधिकार्यांनी येथील मजूर सेवक, काही दलालांना हाताशी धरून केल्याने लाखो रुपयाचा चुराडा करून लावण्यात आलेली रोपटे आता वाळू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभाग हदगाव अंतर्गत झालेल्या कामाच्या भ्रष्टाचाराचे बिंग आता लवकरच फुटणार आहे. 

याच बरोबर तालुक्यातील बोरगडी, कार्ला पी, सवना ज., दरेसरसम, धानोरा, मंगरूळ, आदीसह अन्य ठिकाणी सुद्धा लावण्यात आलेले वृक्ष लागवडीत पळसपूर प्रमाणेच कारभार करण्यात आला असून या ठिकाणच्या कामाची चौकशी केल्यास तालुक्यात झालेल्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांची टोळी समोर येईल असेही मजुरांचे म्हणणे आहे.   

मागील महिन्यात उपोषण केलेल्या एका मजुराने अजूनही हक्काची मजुरी न मिळाल्याने पोस्ट खात्यात माहितीच्या अधिकारातून उचल झालेल्या रक्कमेची माहिती मागविली आहे. या कामात पोस्ट अधिकारी, वनीकरण अधिकारी, मजूर सेवक व दोन दलालांनी फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सदर माहिती हातात येतच या सर्वाना जेलची हवा खावू घालणार असल्याचे त्याने प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी