उस जाळून खाक...

नांदेड(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुक्यातील मौजे आन्देगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पाच एकराचा उस जाळून खाक झाल्याची घटना दि.२५ रोजी घडली आहे. या घटनेत सदर शेतकर्याचे लाखोचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी रास्त मागणी शेतकर्याने केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील शेतकरी गजानन भुरन्ना भूषणवाड यांच्या नावाने गात क्रमांक ३१४ मध्ये शेती आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात शेतीतील कापूस, सोयाबीन नुकसानीत आले असून, थोडफार उस असल्याने उपलब्ध पाणी साठ्यातून जागविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो सुद्धा महावितरण कंपनीच्या विद्दुत तारांच्या घर्षणाची चिंगारी पडल्याने जाळून खाक झाला आहे. याच उसाच्या शेतातून महावितरण कंपनीचे विद्दुत तारा गेलेल्या असून, तारा लोंबकळतात. या बाबतची माहिती अनेकदा महावितरण कंपनीला शेतकर्याने दिली होती. परंतु महावितरण कंपनीच्या अभियंता, लाईनमन यांनी तार तुटलेले असले तरी त्यांनाच पुन्हा पुन्हा जोडून विद्दुत पुरवठा केला जातो आहे. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे रविवारी दि.२५ रोजी आलेल्या थोड्याश्या वार्यामुळे या तारांचे घर्षण झाल्याने ठिणगी पडून उसने पेट घेतला.

यावेळी शेतकरी गजानन हा नांदेडला गेलेला होता. उसने पेट घेतल्याची माहिती शेजारच्या शेतकर्याने दूरध्वनीवरून दिली, परंतु सदर आग विझविणे अवघड झाल्याने २ हेक्टर शेतातील अक्खा उस जाळून खाक झाला आहे. वर्षभर उस वाढविण्यासाठी केलेली मेहनत काही तासात वय गेली असून, या घटनेमुळे माझे नुकसान झाले असल्याचे शेतकर्याचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती तलाठी व पोलिस स्थानकास देण्यात आली असून, महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. या बाबतची चौकशी करून विद्दुत कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी