उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार
लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर यांना जाहीर


मुंबई(प्रतिनिधी)राज्य शासनाचे लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक  श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी, श्री.विजय विश्वनाथ कुवळेकर तसेच श्री.दिनकर केशव रायकर यांना देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा आज केली. या सोबतच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार, 4 फेब्रुवारी  रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे होणार आहे. 

लोकमान्य  टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार 

2011 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै.तरुण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यन्त काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमतंक, गोवादूत, मुंबई तरुण भारत, जळगाव तरुण भारत मध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 45 वर्षाहून अधिक काळ अनुभव असलेले श्री जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे.

2012 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.विजय विश्वनाथ कुवळेकरयांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई तसेच संपादक सकाळ, कोल्हापूर अशी जबाबदारी सांभाळली आहे. 33 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले श्री. कुवळेकर यांना जीवनगौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक,आचार्य अत्रे,कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत. 
2013 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.दिनकर केशव रायकर हे सध्या दै. लोकमतचे समूह संपादक आहेत. त्यांनी इंडीयन एक्सप्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक,दै. लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे  संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना 50 वर्षांचा पत्रकारितेतला अनुभव असून पुढारीकार ग.गो. जाधव पुरस्कार,सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार,कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वर्ष 2011,2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले असून विजेत्यांना रोख पारितोषकाबरोबरच मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येईल. 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2011 

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दै. झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी असलेल्या शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) दै.लोकमत समाचारचे, जळगांव प्रतिनिधी श्री.मुकेश रामकिशोर शर्मा यांना(41 हजार रुपये);यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथील उपसंपादक, श्री.इरशाद लतिफ बागवान यांना (41 हजार रुपये);पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई  ब्युरो चीफ,श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै.सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार श्री.भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये);दादासाहेब पोतनीस पुरस्कार,नाशिक विभाग, दै.लोकसत्ताच्या,नाशिक  प्रतिनिधी,श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये,यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी  (पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), दिव्य मराठी, औरंगाबादचे  विशेष प्रतिनिधी श्री.रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, ठाणे येथे महाराष्ट्र टाईम्सचेवरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार,पुणे विभाग, श्री.गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन,(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार,कोकण विभाग, दै.लोकमतचे, रत्नागिरी  तालुका प्रतिनिधी,श्री. शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग,  महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग,अकोलायेथील दै.लोकमतचेवरिष्ठ उपसंपादक, श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,नागपूर विभाग,दै.लोकमतचे, नागपूर येथील  उपसंपादक श्री.मिलिंद किर्ती यांना(41 हजार रुपये).

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - २०१२

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातमीदार, श्री.म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथे  दै.सकाळ टाइम्सचे  विशेष प्रतिनिधी, श्री.शाश्वत गुप्ता रे, (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी),हिंगोली येथील दै.भास्करचे  जिल्हा प्रतिनिधी, श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट, (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै.इन्कलाबचे मुंबई येथील पत्रकार श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन, (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी)(मा. व ज.), सांगली येथील माहिती अधिकारी, श्री.सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ,  श्री.मनोज प्रभाकर लेले, (41 हजार रुपये),  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील दै.प्रहारचे छायाचित्रकार, श्री.अतुल मोहन मळेकर, (41 हजार रुपये),केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार, श्री.नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये)

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि श्री.नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे  (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, मुंबई येथील येथे दै.लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी श्री.जमीर दाऊद काझी,(41 हजार रुपये),नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील,वार्ताहर, दै.लोकमत, सातारायांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव, श्री.रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै.ॲग्रोवनचे बातमीदार,श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले यांना (41 हजार रुपये),लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती  विभाग, बुलडाणा येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक,श्री.सचिनबलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील  दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री.चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार रुपये),

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०१३

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी, श्री. रामचंद्र विठ्ठल देठे यांना  (41 हजार रुपये),  पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे  श्री.सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये)

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँन्डंट, लोकसत्ता, नाशिक, (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये),आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, (41 हजार रुपये), मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी श्री. संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना 

(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग,श्री. संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग,श्रीमती जान्हवी सराटे,प्रतिनिधी,दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना  (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील येथे  दै. दिव्य मराठीचे  प्रतिनिधी, श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर, यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे उपसंपादक श्री.चंद्रशेखर गिरडकर यांना(41 हजार रुपये)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी