श्रोते मंत्रमुग्ध

हिमायतनगर(वार्ताहर)येथील जी.प.कन्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कला गुण दर्शनाचे सादरीकरण करीत पालक, शिक्षक व प्रेक्षकांची दाद मिळविली.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जी.प.कन्या शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिंदे, हनुसिंग ठाकूर, विजय शिंदे, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, प्रा.शिवाजी भादरगे, प्रा.कदम सर, विश्वनाथ ऊटलवाड, परमेश्वर तीप्पणवार, जाधव सर, मुगटकर सर, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या गीताने सुरुवात झाली. त्यानंतर आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्तांना..., ढोल बाजे..., आता माजी सटकली...,वो किशना है..., तसेच नन्हा मुंह राही हुं.. देश का सिपाही हुं... या गीतावर उत्कृष्ट कला सदर करून प्रणव बुरकुले या विद्यार्थ्याने उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. तसेच चिमुकल्या विद्यार्थीनिनी दही दुध लोणी...घाघर भरुनी या गीतावर वेदिका गुंडाळे या विद्यार्थिनीने अभिनय नृत्य सदर केले. टीम टीम टीम्बाली.., उर्दू विद्यार्थ्यांनी अपने मां बाप का तू दिल न दुखा.. दिल न दुखा.... या (कव्वाली)फकीर गीताने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. त्यानंतर जलवा तेरा जलवा.., देश रंगीला...देश मेरा रंगीला.., कुण्या गावाचे आले पाखरू...खुद खुद हसताय गालात.., ढोलकीच्या तालावर ..घुंगराच्या बोलावर..., इस लावणी के सात जावूया पंढरपूरला.. येतोय का रिक्षावाला.., या गीताने विद्यार्थ्यानिंच्या अदाकारी नृत्याने कार्यक्रमात धम्माल उडविली होती. यानंतर चल जेजुरीला जाऊ.., मैने पायाल है ठणकाई..., राधा तेरा झुमका...,पंखीडा ओ पंखीडा...या गीतावर आकांक्षा मादसवार, सोनल जैन, पायल दमकोंडवार, श्रुती बचकलवाड, ऋतुजा मोरे, निकिता उत्तरवार, रेणुका ठाकूर, श्रद्धा पार्डीकर, वैष्णवी ठाकूर या ग्रुपच्या विद्यार्थीनिनी गीताच्या तलावर दांडियाच्या गजरात उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळविली. यासह देशभक्ती, वृक्ष संवर्धन, सर्वधर्म समभाव, भावगीत, लोकगीत, लावणी, नाटिका, समूह गायन, आदीसह अनेक रिमिक्स, गीतावर धम्माल सदरीकर्ण करून उपस्थित मान्यवर, पालक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, सौ. गुंडाळे मैडम, पाटील सर, पठाण सर, राठोड सर, पानपट्टे मैडम, झळके सर, बेन्जरगे सर, शेख सर, अल्ला सर, गायकवाड सर आदी शिक्षक, शिक्षिका यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी