स्वयंशासन दिवस साजरा

हुतात्मा जयवंतराव कॉलेजमध्ये स्वयंशासन दिवस साजरा 

हिमायतनगर(वार्ताहर)येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात स्वयंशासन दिवस उत्स्फुर्थपणे साजरा करण्यात आला असून, यावेळी विद्यार्थी - विद्यार्थीनिनी एका दिवसाच्या शिक्षकाची व कर्मचार्याची भूमिका बजावून प्रशासकीय जबाबदारीचा अनुभव घेतला आहे.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी येथील हुजापा महावियालायातील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह संमेलन व स्वयंशासन दिवस दि.२४ शनिवारी उत्साहात साजरा केला. यादरम्यान सकाळी शालेय वेळेपासून अनेक विद्यार्थी -विद्यार्थीनिनी मुख्याध्यापक, शिक्षक, कारकून, ग्रंथपाल आणि सेवकाची भूमिका बजावून अध्यापन, प्रशासन व शिस्तीच्या जबाबदारीचा अनुभव घेतला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेवून शाळेचे प्राचार्य क्षीरसागर, संस्थेचे साची प्रभाकर मुधोळकर, मुख्याध्यापिका खंबायतकर, यांच्यासह नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार परमेश्वर शिंदे, असद मौलाना, दिलीप शिंदे आदींनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे अभिनंदन करून भविष्य काळात अशीच जबाबदारी नेटाने पार पडण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान एका दिवसाच्या शिक्षकाची भूमिका निभावणार्या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्याला आलेल्या अनुभव भाषणातून प्रकट केले. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी