मार्कण्डेय जयंती

हदगांव मध्ये महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी 

हदगांव(वार्ताहर)महर्षी मार्कण्डेय जयंती निमीत्त ह.भ.प. माधव महाराज सुनकेवार व गोपाळगीर महाराज दत्तबर्डी संस्थान यांच्या उपस्थितीत मराठवाडा पद्‌मशाली संघटनेचे अध्यक्ष व सहकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हदगांव तालुका पद्‌मशाली संघटनेच्या वतीने महर्षी मार्कण्डेय जयंती हर्षउल्हासात साजरी करण्यात आली.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हदगांव येथे पद्‌मशाली समाजाच्या वतीने दि. 26 रोजी महर्षी मृत्युंजय मार्कण्डेय यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. अभिषेक पुजा व त्यानंतर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत ह.भ.प. माधव महाराज सुनकेवार यांनी महर्षी मृत्युंजय मार्कण्डेय यांच्या जिवन चरित्राचे सार समाजास सांगीतले. दु. 2 ते 3 वाजता दत्तबर्डी संस्थानचे महंत गोपाळगीर महाराज यांनी उपस्थित समाजास मार्गदर्शन केले. दु. 3 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी हदगांव तालुका पद्‌मशाली समाज संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी मराठवाडा पद्‌मशाली संघटनेचे अध्यक्ष गणेश गुंडेवार, नागभुषण दुर्गम, व्यंकटेश चिलवरवार, पांडुरंग कोकुलवार आदी पद्‌मशाली समाजाचे पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी हदगांव तालुका पद्‌मशाली समाज संघटनेच्या अध्यक्षस्थानी बालाजी चिलवेरी, उपाध्यक्ष : नाना उर्फ ज्ञानेश्र्वर गुडटवार, सचिव : नामदेव कोंडलवाड, कोषाध्यक्ष : ज्ञानेश्र्वर पिचकेवार यांची निवड करण्यात आली तर कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गणेश तमलवाड, सचिव : बाबुराव मादसवार, तर महिला आघाडी तालुका अध्यक्षा : सौ. राजमनी यमेवार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या कार्यक्रास संजय राहुलवार, रुख्माजी उर्फ बाबुअण्णा पिचकेवार, बालाजी यमेवार, गोविंद यमेवार, नारायण ताटीकुंडलवार, सदानंद गंगुलवार, अशोक तालेवार, दिलीप पिचकेवार, मंचेवार, गुडेवार, आंकमवार आदी उपस्थित होते तसेच पाथरड, आष्टी, वाळकी, तामसा, चोरंबा, वायपना, उमरी, येवली, वटफळी, हदगांव व हदगांव तालुक्यातील सर्व समाजबांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी