प्रजासत्ताक दिन

नांदेड रुरल डेंटल कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा    


नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरुदत्त प्रतिष्ठाण नांदेड संचलित नांदेड रुरल डेंटल कॉलेज व रिर्सच सेंटर,पांगरी ता.जि.नांदेड येथे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव विनोद कुमार श्रीरामवार यांच्याहस्ते करण्यात आले. या महाविद्यालयाचे हे प्रथम वर्ष असून पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्पोर्ट डे तसेच सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. या समारंभास डॉ. मुकूल जोशी, सचिन काबरा व रंजनाताई विनोदकुमार श्रीरामवार , पांगरी येथील उपसरपंच आनंदा हनमंते व पांगरीकर यांच्यासह प्राध्यापक, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी