प्रजासत्ताकदिन साजरा

प्रजासत्ताकदिन साजरा
नांदेड(प्रतिनिधी)प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.भाकप कार्यालयात-भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात ज्येष्ठ कॉ. के.के. जामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी जिल्हा सचिव कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.श्याम सोनकांबळे, कॉ.गौतम सूर्य, कॉ.गोपाल केरमकोंडा, कॉ.रमाबाई बिसेन, कॉ.पद्मा तुम्मा, कॉ.शारदा गुरुपवार, कॉ. राखेवारबाई, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.अख्तर यांच्यासह कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वि.भ.कुंभार वाचनालय-विनायकनगर भागातील विठ्ठल बलभीम कुंभार सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताकदिनानिमित्त जि.प.अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीबाई पवार, सौ.ललिता कुंभार, विजया सोलनकर, रुक्मणी कुंभार, डॉ. मार्लेवाड, सौ.सुमती नटेशन, शिवकन्या कुंभार, ऍड.वैशाली कुंभार, रमेश पटणे, रमेश लांडगे, शिवाजी ढगे, संजय पवार, विनोद बिरादार, सतीश चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, रमेश खानसोळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी