अवैद्य दारू विक्री बंद करा.


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सरसम बु,इंदिरा नगर येथील शाळेजवळ अवैद्य रित्या विक्री केली जाणारी देशी दारू बंद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील महिलांनी पोलिस निरीक्षक व तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षाकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नानादेद किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील इंदिरा नगर येथे मागील अनेक वर्षापासून एका व्यक्तीकडून जी.प.शाळेजवळ देशी दारूची अवैद्य रित्या विक्री केली जात आहे. याबाबत येथील महिलांनी अनेकदा आवाज उठविला होता. त्यानंतर काही महिने दारू विक्री बंद करून पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने विक्रीचा धंदा चालविला जात आहे. गत वर्षभरापूर्वी हिमायतनगर येथे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम आल्यानंतर इंदिरा नगर सह तालुक्यातील अनेक ठिकाणच्या अवैद्य देशी दारू विक्रीवर अंकुश बसले होते. परंतु त्यांनी बदली होताच पुन्हा इंदिरा नगर येथील व्यक्तीने दारू विक्रीचा गोरखधंदा सुरूच केला असून, त्यामुळे शाळेतील चिमुकल्या बालकावर याचा विपरीत परिणाम होत आहे. एवढेच नव्हे शाळेच्या बाजूलाच दारूची विक्री होत असल्याने घन दुर्गां

ची तथा दारू पिवून झिंगणाऱ्या व्यक्तींचा नाहक त्रास महिलांना व ये - जा करणार्यांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे सहजरीत्या गावात दारू मिळत असल्याने रोजमजुरी करणारे व काही शेतकरी सुद्धा या दारूच्या आहारी जात असून, परिणामी अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी या ठिकाणी राजरोसपणे विक्री होणारी दारू बंद करावी अशी मागणी येथील महिलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावर सिमाबाई गोखले, पार्वतीबाई लोकरे, कमलबाई, रेखा गुंडेकर, लक्ष्मीबाई, धुरपताबाई, गंगाबाई, निर्मलाबाई, कौशल्याबाई, नंदाबाई, कमलबाई माने, शारदाबाई आदींसह शेकडो महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी