पारायण सोहळा

श्री रामेश्‍वर शिव मंदीर कलशारोहण सोहळा
अखंड शिवनाम सप्‍ताह ग्रंथराज परमरहस्‍य पारायण सोहळा

नांदेड(प्रतिनिधी)सर्व भाविक भक्‍तांना कळविण्‍यांत अत्‍यंत आनंद होते की, प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी श्री ष.ब्र.108 सदगुरु राष्‍ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्‍या कृपा आशिर्वादाने श्री रामेश्‍वर शिव मंदीर श्रीराम नगर नांदेड येथे मि.वाघ शु.10 शके 1936 दि.29 गुरुवार पासुन ते दि.5 पर्यंत अखंड शिवनाम सप्‍ताह व ग्रंथराज परमरहस्‍य पारायण सोहळा (वर्ष 12 वे) व तसेच यावर्षी रामेश्‍वर शिव मंदीरावर कलशारोहन सोहळा आयोजन माघ कृ.पक्ष प्रतीपदा दि.4 रोज बुधवार सकाळी 11.00 वाजता राष्‍ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्‍या सान्निध्‍यात शुभहस्‍ते अनेक गुरुवर्यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत आहे, तरी सर्व भाविक भक्‍तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन जिवन कृतार्थ करुन घ्‍यावे.

अखंड शिवनाम सप्‍ताहामध्‍ये श्री ष.ब्र.108 सदगुरु राष्‍ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु सांब शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु रुद्रमुणी शिवाचार्य महाराज मुदखेडकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु शिध्‍ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु करबसव शिवाचार्य महाराज लासिन मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु निर्वानरुद्रपशूपती शिवाचार्य महाराज नागठान या गरुवर्यांची उपस्थिती व अमृत उपदेश होणार आहे. दैनंदीन कार्यक्रमात रोज सकाळी 5 ते 6 शिवपाठ, 7 ते 8 श्रींचा रुद्राभिषेक, 9 ते 11 ग्रंथराज परमरहस्‍य पारायण, 11 ते 12 प्रवचन, दुपारी 12 ते 3 प्रसाद, 3 ते 5 मन्‍मथ गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, रात्री 8 ते 11 शिवकिर्तन नंतर शिवजागर राहील.

दि.29 रोजी प्रवचनकार शि.भ.प. कार्तीक स्‍वामी मारेपल्‍ले, बसवेश्‍वर नगर, किर्तनकार शि.भ.प.विश्‍वनाथ स्‍वामी वडवळ, अन्‍नदाते माणिकराव विठ्ठलराव नरंगले, दि.30.01.2015 रोजी प्रवचनकार सौ.कमलबाई विश्‍वनाथ स्‍वामी, शारदा नगर,किर्तनकार शि.भ.प.राजाभाऊ रामभाऊ खरबडकर, युसूफ वडगांवकर, अन्‍नदाते किरण दिगांबर कारामुंगे, दि.31 रोजी प्रवचनकार शि.भ.प.शेषीकांत पाटील बसवेश्‍वर नगर, किर्तनकार शि.भ.प.संगीता गणेश मस्‍कले रुईकर, अन्‍नदाते कपिल गोविंदराव हत्‍ते हनुमान गड, दि.01 रोजी प्रवचनकार शि.भ.प.सौ.इंदुबाई संतराम यजगे, किर्तनकार शि.भ.प.मन्‍मथअप्‍पा डांगे गुरुजी उस्‍माननगर अन्‍नदाते गजानन मनोहर सुपारे (सगुण उडपी), दि.02 रोजी प्रवचनकार शि.भ.प.सोमवारे मानेजी साहेब मालेगाव, किर्तनकार शि.भ.प.काशिनाथअप्‍पा सांगवे आनंतपाळ शिरुर अन्‍नदाते शिवकांत संभाजी भृतन्‍ना जळकोटकर, दि.03 रोजी प्रवचनकार शि.भ.प.मारोतराव नळगेअप्‍पा खेडकरवाडी, किर्तनकार शि.भ.प.शिवशरण गुरुजी रटकलकर सावरगाव अन्‍नदाते रमाकांत बाबुराव थोटे गोविंद नगर, दि.04 रोजी प्रवचनकार शि.भ.प.गजानन प्रभुअप्‍पा कल्‍याणकर, किर्तनकार शि.भ.प.किर्तन पंडीत भूषण स्‍वामी वाखारीकर व शि.भ.प.रमेश कस्‍तुरे दगडगाव, दि.05 रोजी प्रसादावरील किर्तन 11 ते 1, किर्तनकार शि.भ.प.मन्‍मथअप्‍पा खके चारठाणा नंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल.  

विणेकरी बाबुराव चाकोते, रितेश घाळे, सुरेश हिंगमीरे, लक्ष्‍मण सोनवळे, बालाजी तुपलवाड, विठ्ठलराव भुरे, बळीराम खळगे, संतोष चाकोते, नागोराव धुळशेटे, त्रिंबक मंगनाळे, हरिश्‍चंद्र घुगे, रामराव सोनटक्‍के, मुक्‍तेश्‍वर खाकरे, राजेश सोनटक्‍के, रवि घाळे, प्रशांत सोनटक्‍के, अविनाश गोंड, जगदिश सोनटक्‍के, माणिकराव नरंगले, लक्ष्‍मण सोनटक्‍के आहेत. हार्मोनियम वादक बालाजी वारकड, नंदुअप्‍पा देवणे, विश्‍वांभर सावळे, भुरेअप्‍पा शिराढोणकर, मनोज पेंटर, प्रल्‍हाद होळगे, मृदंगवादक केदार, हानमंत देशमुख, चंद्रशेखर शिराळे, तात्‍या पांचाळ, मारुती कावडे, मारोती स्‍वामी, उत्‍तमराव घाडगे, शिवानंद दापशेटकर, राचेप्‍पा स्‍वामी,  गायक रमेश कस्‍तुरे, अनिल भालेराव, भारत ब्‍याळे, रामचंद्र नरवाडे, बालाजी वारकर, नंदुअप्‍पा देवणे, त्र्यंबक पावडे, लाठकर, हनमंत देशमुख, दिपक खटके, कैलाश टाले, हनमंत पेंटर अंजनीकर, तसेच नवयुवक मंडळ बंटी डोणगावकर, संतोष बन, प्रभुदास कपाटे, राजेश हिंगमीरे, पप्‍पु हुडगुलवाड, जगदीश सोनटक्‍के, दत्‍ता भारती, पप्‍पु सोनटक्‍के, सतिश बेंद्रीकर, रवि घाळे, रवि कल्‍याणकर रामेश्‍वर शिवमंदीर नवयुवक सदभक्‍ती मंडळ आहेत.

तरी सर्व भाविक भक्‍तांनी श्री रामेश्‍वर शिवमंदीर कलशारोहण सोहळा व अखंड शिवनाम सप्‍ताह परमरहस्‍य पारायण सोहळा कार्यक्रमाचा लाभ घेवून आपले जिवन कृतार्थ करुन घ्‍यावे,  असे आवाहन समस्‍त श्रीरामनगर, हनुमानगढ सदभक्‍त मंडळी व श्री रामेश्‍वर शिव महिला व पुरुष भजनी मंडळ नांदेड यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी