प्रजासत्‍ताक दिन साजरा



हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये तथा जी.प.शाळेत त्या त्या प्रमुखांच्या हस्ते सोमवारी प्रजासत्ताक दिन तिरंगा ध्वजारोहनाने उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 

भारतीय प्रजासत्‍ताक दिनाच्‍या 65 व्‍या वर्धापन दिन २६ जानेवारी उत्साहात साजरा करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयात दोन दिवसापासून मैदान सफाई, विविध सोयीसुविधा, रंगरंगोटी सजावट आदीची जय्यत तयारी करण्यात आली होती. सोमवारी सकाळी शासकीय वेळेत ठीकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, हरित क्रांतीचा संदेश, प्रजासत्ताक दिनाचे महत्व, विविध प्रकारचे खेळ सदर करून मान्यवरांच्या शुभेच्छा मिळविल्या. 

शहरातील पोलिस स्थानकात सर्वात प्रथम म्हणजे ७.०५ वाजता पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज चढवून मानवंदना देत तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत पार पडले. तत्पूर्वी पोलिस कर्मचार्यांनी संचालन सादर केले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात बिराजदार यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शहरातील राजा भगीरथ शाळेत संस्थेचे सचिव व्ही.एन.बर्लेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील ग्रामपंचायत कार्यालयात ८.०५ वाजता प्रथम महिला सरपंच श्रीमती गंगाबाई शेषेराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. सकाळी ७.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती दत्तराम पाटील करंजीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भारतीय स्टेट बैन्केत शाखाधिकारी श्री जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. शहरातील किड्स वर्ल्ड नृसिंह इंग्लिश स्कूल मध्ये शाळेचे संचालक संजय मारावार यांच्या हस्ते ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शहरातील जी.प.कन्या शाळेत मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामीण भागातील जी.प.शाळेत ध्वजारोहण उत्साहात पार पडले यात तालुक्यातील दरेसरसम तांडा येथे जी.एम.कांबळे यांच्या हस्ते, कपाट्याची वाडी येथे विजय दुर्गे यांच्या हस्ते, उमरहिरा तांडा येथे आर.व्ही.कस्तुरे यांच्या हस्ते तर भिष्याची वाडी येथे व्ही.डी.दळवी यांच्या हस्ते आणि दरेसरसम येथील जी.प.शाळेवर एम.आर.राउत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी गणवेश परिधान करून तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रीत गाईले. तसेच विविध गुणदर्शन, खेळत सहभाग नोंदविला. 

पंचायत समिती कार्यालयात ध्वजारोहण 
-------------------------------------- 

येथील पंचायत समिती कार्यालयात सभापती आदेलाबाई हातमोडे यांच्या हस्ते ८.२५ मिनिटांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी विलास गंगावणे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, प.स.सदस्य, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी