अविश्वास ठराव बारगळला

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील महिला सरपंचावर याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव तहसीलदार यांनी फेटाळून लावला आहे. तसेच तिसर्या अपत्याच्या कारणावरून विद्यमान उपसरपंचास अपात्र ठरविण्यात आल्याने दुसर्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात खुद्द उपसरपंचा पडल्याची चर्चा गावात सुरु आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षपासून सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणातून उपसरपंच मारोती पवार यांच्यासह गरम पंचायत सदस्य गणेश राउलवाड, शोभाबाई म्याकलवाड, भीमराव कौठेकर, श्रीराम बोड्डावार, विजय भाटे यांनी विद्यमान महिला सरपंच सौ.शोभाबाई बालाजी कोंडरवाड यांच्यावर अविश्वास ठराव ७ जानेवारी २०१५ ला दाखल केला होता. त्याचा अनुषंगाने दि.२० मंगळवारी येथील तहसीलदार श्री शरद झाडके यांनी सिरंजनी ग्रामपंचायतीत जावून पडताळणी केली. दरम्यान अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच मारोती गणपत पवार यांना ३१ मार्च २०१२ रोजी तिसरे अपत्य झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी सदर उपसरपंचास ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवून अविश्वास ठरावासाठी मतदान करण्याचा अधिकार काढून घेतला. त्यामुळे सरपंच महिलेविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी यांनी सरपंच पदी पुन्हा सौ.शोभाबाई कोंडरवाड यांनाच पदावर कायम राहण्याचा निर्णय दिल्याने दुसर्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतः उपसरपंच पडल्याची एकच चर्चा गावात सुरु आहे.

अपात्र झाल्यानंतरही पदाचा दुरुपयोग घेतला
------------------------------------
विद्यमान उपसरपंचास अपात्र ठरविण्यासाठी मागील दोन वर्षापासून येथील शिवसैनिक युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज -१) व १६ नुसार अर्जदाराचा विवाद अर्ज मान्य करून गैरअर्जदार मारोती गणपत पवार ग्रामपंचायत सदस्य यांना हयात अपत्याच्या संखेत दि.१२ मार्च २०११ मध्ये भर पडून एकूण आपट्याची संख्या दोन पेक्षा अधिक झाली असल्यामुळे सिरंजनी ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अनर्ह ठरविण्यात आल्याचा निकाल दि.३० मार्च २०१३ साली अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिला होता. परंतु याबाबतची माहिती राजकीय दबावापोटी दडवून ठेवून या सदस्याने उपसरपंच पदाचा कारभार पाहत शासन व जनतेची दिशाभूल केली आहे. या प्रकारांची सखोल चौकशी होऊन अपात्र घोषित झाल्यानंतरही पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी