तहान भागली

हिमायतनगर(वार्ताहर)गत अनेक वर्षपासून या न त्या समस्येने समोर येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नूतन मुख्याध्यापक श्री असद बेग यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांची तहान भागली आहे.

शहरातील आकारावरील जी.प.शाळा नावाने प्रसिद्ध असलेल्या शाळेत उर्दू - मराठी विभागातील शेकडो विद्यार्थी पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतात. परंतु येथील विद्यार्थ्यांना अनेक सोई सुविधेच्या समस्येला सामोरे जावे लागत असे. त्यात प्रामुख्याने पिण्याचे पाणी, शौच्चालाय आदीसह अनेक समस्या होत्या. परंतु या ठिकाणी नव्याने पदभार स्वीकारलेले मुख्याध्यापक श्री असद बेग वाहेद बेग यांच्या पुढाकाराने शालेय व्यस्थापन समिती स्थापन झाली. त्यामुळे अनेक कामना गती मिळाली असून, नुकतेच या ठिकाणी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या निधीतून महत्वाची गरज असलेली पाणी समस्या सोडविण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टैन्क बसवून नळ लावण्यात आली आहेत. तसेच शौच्चालयाची सफाई करण्यात एवुन विद्यार्थिनीसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच शाळेत होणार्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले साउंड सिस्टम, तसेच वर्ग खोल्या व बैठक कार्यक्रम खोलीत लाईट फिटिंग करून उजेडाची सोय झाली आहे. त्यामुळे डबघाईस आलेल्या शालेय संजीवनी मिळाली असून, हळू हळू सर्व सुविधा उपलब्ध करून शाळेला नावारूप प्राप्त करून देवू असेही श्री बेग यांनी पाण्याचे व आनंद मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य फेरोज खान महेबूब खान, सलाम कुरेशी, तय्यबा बी, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक पत्रकार ज्ञानेश्वर पंदलवाड, शे.इस्माईल, सा.आदिल, अ.मोइद सर, सलीम खान, सिराज सर, मोहसीन, सय्यद, जबीन बाजी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी