रुग्णांची गैरसोय

हिमायतनगर(वार्ताहर)ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सरफराज खान हे मागील अनेक महिन्यापासून अनधिकृतपणे गैरहजर असल्याने बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकानाच करावी लागत आहे.

हिमायतनगर तालुक्यात्त ६९ गावे व ४० वाडी तांडे असून, एकूण १०९ गावाच्या नागरीका बरोबर किनवट तालुक्यातील इस्लापूर मधील काही गावातील नागरिक सुद्धा उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गर्दी होत असून, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे काम झाल्यानंतर रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होऊन शासनच मोफत उपचाराचा लाभ मिळेल अशी अपेक्षा सर्वाना होती. परंतु रुग्णाऐवजी ग्रामीण रुग्णालयाला उपचाराची गरज असल्याचे या ठिकाणच्या समस्यांवरून दिसून येत आहे.

सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त एक वैद्यकीय अधिकारी व एक वैद्यकीय अधीक्षक कार्यरत दिसतात. या ठिकाणी नियुक्त तीन वैद्यकीय अधिकार्यापैकी एका महिला डॉक्टरने राजीनामा दिला असून, एक वैद्यकीय अधिकारी डॉ. सरफराज हे गत अनेक महिन्यापासून गैरहजर असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईक मधून केला जात आहे. अनधिकृत रित्या गैरहजर राहणाऱ्या डॉ.सरफराज यांना जिल्हा आरोग्य अधीकार्याचे आशीर्वाद असल्याने या ठिकाणी अनुपस्थित राहून सुद्धा मासिक पगार उचलत असल्याची माहिती पुढे येत आहे. अश्या लापरवाह कामचुकार अधिकार्यास वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

त्यामुळे एका वैद्यकीय अधिकार्यावर बाह्य रुग्णांचा उपचार केला जात असून, त्यांची सुट्टी असल्यास वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर यांना रुग्णांची तपासणी करावी लागत आहे. कधी मधी त्यांना मिटिंग अथवा कार्यालईन कामानिमित्ताने बाहेर जावे लागल्यास येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना थेट खाजगी रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे हिमायतनगर येथे असलेले ग्रामीण रुग्णालय असून, अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनधिकृत रित्या गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकार्याची चौकशी करून, राजीनामा दिलेल्या डॉक्टरांची जागा रिक्त करून अन्य अधिकार्यांना नेमून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.

या बाबत वैद्यकीय अधीक्षक गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, शासकीय नियमानुसार वैद्यकीय अधिकार्याची जागा या ठिकाणी रिक्त नाही, म्हणून नवीन वैद्यकीय अधिकारी देत येत नाही. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास आम्ही कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी