टेंभूर्णी पैटर्न

स्वच्छतेचा टेंभूर्णी पैटर्न जिल्हाभरात राबविणार... रामोड

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे टेंभूर्णी येथे राबवण्यात आलेला स्वच्छता कार्याकार्माचा पैटर्न जिल्हाभरातील तालुक्यात राबविण्यात येवून स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागात पोन्चविण्यात येईल असे मत नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांनी व्यक्त केले.

ते हिमायतनगर तालुक्यातील निर्माण ग्राम पुरस्कार प्राप्त टेंभूर्णी गावातील साव्छातेची पाहणी  करण्यासाठी शिष्ट मंडळासह दि.११ जानेवारी रोजी आले होते. निर्माण ग्राम टेंभूर्णी येथील सांडपाणी व्यवस्थापन शौच्चालय बांधकाम, परसबाग व नालीमुक्त झालेल्या टेंभूर्णी गावकर्यांचे तोंड भरून प्रशंसा केली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, टेंभूर्णी येथे राबविण्यात आलेल्या शौच्चालाय बांधकामामुळे कमी खर्चात व अगदी सोयीचे शौच्चालय येथील ग्रामस्थांनी निर्माण केले आहे. त्यांनी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली असल्याने डासांची उत्पत्ती न होता साथीच्या आजारांवर मात करण्यात आली. परिणामी गावाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत झाली असून, स्वच्छतेचा टेंभूर्णी पैटर्न जिल्हाभर राबविण्यात येवून प्रत्येक तालुक्यातील दोन गावे प्रथमतः निर्माण करण्यात येतील असेही ते म्हणाले. यावेळी प्रल्हाद पाटील, विठ्ठल देवसरकर, गंगाराम मुळे, गणेश माने,, बाबुराव माने, गोविंद तवर, गणेश माने, पार्वतीबाई मुळे, दत्त उमीनवाड, शिवाजी देवसरकर, आदीसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.      

सदरील पाहणी दौर्यात उमरी येथील गटविकास अधिकारी, अर्धापूर येथील गटविकास अधिकारी पी.आर.भिसे, वाघमारे मैडम, श्री शिंदे नांदेड, मुदाखेडचे गटविकास अधिकारी खिरडे, यांच्यासह विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, हदगाव येथील केंद्रे, एस.जी.वानखेडे, धर्माबादाचे उडतेवार आदींसह ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.डी.कदम, वानसागरे, वाडेकर, जीवन कांबळे, मारोती सोनटक्के, पी.एन.लुंगे, राजेश आरु, शंकर गर्दसवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक गावाचे ग्रामसेवक, गटविकास अधिकारी उपस्थित होते.         

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी