क्राईम घटना

विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे वाशी येथील शिवारातील एका विहिरीत या गावच्या जावयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याबाबत हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट जिल्ह्यातील मयत जनार्धन राजाराम पाचपुते कामगार आपल्या कुटुंबासह आंध्रप्रदेशात कामाला गेला होता. कामे संपल्याने परत येताना हिमायतनगर तालुक्यातील वाशी गावात सासरवाडी असल्याने कुटुंबासह आला होता. दरम्यान काल दि.०७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वाशी शिवारातील शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या बाबत मारोती बाबाराव पाचपुते याने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको.जाधव हे करीत आहेत.  

विवाहितेचा शारीरक व मानसिक छळ ..गुन्हा दाखल
हिमायतनगर(वार्ताहर)तुला स्वयंपाक येत नाही..मुलबाळ होत नाही असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा.येथील स्वाती हिच विवाह यवतमाळ जिल्ह्यातील वरुड येथील नारायण गाड्चीलवार याच्याशी झाला होता. सुरुवातील चांगला संसार चालला त्यानंतर नवर्यासह सासरच्यांनी संगनमताने विवाहितेस मारहाण करणे, उपाशी पोटी ठेवणे, जमिनीवर झोपविणे, तुला स्वयंपाक येत नाही, असे म्हणून मारहाण करणे,  तसेच मेकैनिक दुकान टाकण्यासाठी माहेराहून रक्कम घेवून ये म्हणून शाश्रीरिक व मानसिक छळ सुरु केला. नेहमीच सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहिता सौ. स्वाती नारायण गाड्चीलवार हिने हिमायतनगर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून नारायण गाड्चीलवार, वसंत नामदेव गाड्चीलवार, जिजाबाई वसंत गाड्चीलवार, कैलास वसंत गाड्चीलवार, स्वाती कैलास गाड्चीलवार, आनंद मारोती कटकेतेलवार, सर्व रा.वरुड ता.जी.यवतमाळ यांच्यावर विवाहितेचा छळ प्रकरणी कलम ४९८(अ),३२३, ५०४,५०६,(२)३४ भादवी अनुसार हुंडाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको.हरण करीत आहेत.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी