परवाना एकच चालक दुसराच

हिमायतनगरच्या पुरवठा विभागात सावळा गोंधळ.. परवाना एकच चालक दुसराच  
हिमायतनगर(वार्ताहर)अनेक स्वस्त धान्य व केरोसीन वितरण चालक दुकानदारांचा परवाना दुसर्याचा तर दुकान चालवणारे तिसरेच असल्याने तालुक्यात काळ्या बाजाराचा गोरखधंदा जोमात सुरु आहे. या बाबतची माहिती पुरवठा विभागातील संबंधिताना असताना स्वर्थापोठी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ चालविला जात असल्याचे यावरून उघड होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यात स्वस्त धान्य व किरकोळ रॉकेल विक्रीचे परवाने हा चर्चेचा विषय ठरत असून, गत तीन वर्षात वारंवार येथील धान्य काळ्या बाजारात जाताना भोकर पोलिसांनी ताब्यात घेवून कार्यवाही केली आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील पुरवठा विभाग चर्चेत आला आहे. परवाना एकच आणी चालक दुसराच असल्याने मागील वर्षी याचा वादातून येथे निर्मल हत्याकांड घडले असले तरी येथील पुरवठा विभागाने मात्र यातून काही बोध घेतला नाही. सध्या शहर व ग्रामीण भागात चालविण्यात येणारे अनेक परवानाधारक हे मयत झाल्याने त्या दुकानाचे पुन्हा प्रगटन काढणे महत्वाचे आहे. परंतु सदरील दुकानांचा परवाना हा वारस हक्काने कुटुंबातील इतर व्यक्तीला देण्यात येत असल्याने स्वस्त धान्याचा परवाना म्हणजे प्रायवेट प्रोपरटी आहे कि काय..? असा प्रश्न जाणकार व्यक्तीकडून उपस्थित केला जात आहे.  

अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी व शहरी - ग्रामीण भागातील किरकोळ केरोसीन विक्रेत्यांनी तर हि दुकाने भाडेतत्वावर चालवण्यास दिली असल्याचे समजते. त्यामुळे हा कारभार अधिकचि माया जमवण्यासाठी दुकान चालवणारे मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य व केरोसिनचा कला बाजार करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे पुरवठा विभागाच्या संबंधिताचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मयत परवानाधारक व भाड्याने परवाना देणारे दुकानदार यांची पुरवठा विभागाने चौकशी करावी. यात गत २५ ते ३० वर्षापासून परवाना असलेल्यांची चौकशी केल्यास  गैरफायदा घेणाऱ्या परवानाधारकांचे व काळा बाजार करणाऱ्या दलालांचे बिंग फुटेल अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित लाभार्थी व जागरूक नागरीकामधून व्यक्त होत आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी