पळसपूर येथील मजुरांचे उपोषण



हिमायतनगर(वार्ताहर)पळसपूर येथील मजुरांनी समाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून मजुरीची मागणी व रोपवाटीकेतील फेकून दिलेल्या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितावर पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी करत दि.१५ पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. बुधवारी यास तीन दिवस झाले असून, जोपर्यंत मजुरीची रक्कम नगद स्वरूप दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. असे मजुरांनी ठणकावून सांगत चौकशीच्या आश्वासनांचे पत्र घेण्यास नकार दिल्याने सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांची धडधडी वाढली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, पळसपूर येथील १४ मजुरांनी सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत पळसपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे व रोपे लावण्याचा कार्यक्रमात सहभाग घेवून काम केले. परंतु अद्याप मजुरांना मजुरीची रक्कम मिळाली नाही. घाम गाळणाऱ्या मजुरांना हक्काच्या मजुरीसाठी आज देवू ..उद्या देवू अशी बनवाबनवी करीत संबंधितानी वर्ष लोटले. अनेक अधिकारी बदलले, मात्र मजुरी काही मिळाली नाही. यासाठी नव्याने आलेल्या अधिकाऱ्यासह देखरेख करणार्यांना मजुरीची मागणी केली. एवढेच नव्हे तर गावात तंटा मुक्त समितीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते. बैठकीला मजूर उपस्थित होते, परंतु या प्रकरणात बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयाचे बिले पोस्ट अधिकार्यास हाताशी धरून उचलणाऱ्या एकाहाही अधिकारी, रोजगार सेवक अथवा कोम्पूटर ऑपरेटर तथा दोन दलाल यापैकी एकही जन उपस्थित झाला नाही. १५ दिवस वाट पाहून मजुरांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना या बाबतचे पत्र देवून चौकशीची मागणी केली. मात्र चौकशी तर केलीच नाही उलट कालेबरे केलेल्या मास्तर मध्ये झालेला घोळ मिटविण्याचा आटोकाट पर्यटन व्हाईटनराच्या माध्यमातून केला गेला. तर प्रत्यक्ष एका एका मजुरास भेटून तुझे पैसे देतो असे सांगून मजुरांचा गट फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हि बाब लक्षात आल्याने येथील मजूर गणेश वानखेडे हे आमरण उपोषण तर चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, दयानंद वानखेडे, सरस्वतीबाई शिवाजी वानखेडे, केवळाबाई घोडगे, यांच्यासह अनेक मजुरांनी साखळी उपोषणात सहभाग घेवून दि.१५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

सदरील कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, लावण्यात आलेली रोपे वळून गेल्याने व न लावता शेकडी रोपे फेकून दिल्याने सामाजिक वनीकरण विभागाने शासनाच्या या उपक्रमाला केराची टोपली दाखविली आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आग्रह धरून उपोषणास बसलेल्या मजुरांना परस्पर येथून पळविण्यासाठी तहसीलदार यांनी पोस्टाच्या माध्यमातून पत्र पाठवून आमची चौकशी होईपर्यंत उपोषणाला बसू नका असे सांगत अकलेचे तारे तोडल्याचा आरोप मजुरांनी पत्रकारांची बोलताना केला आहे. एवढेच नव्हे तर तीन दिवसापासून तहसीलदार हे आमच्या समोरून गेले, परंतु आम्हाला भेटून चौकशी केली नाही अशी नाराजी व्यक्त केली. उलट बुधवारी एका कर्मचार्याच्या हस्ते २१ दिवसात चौकशी करतो तुम्ही उपोषण सोडा असे पत्र पाठवून सांगितले. त्यामुळे माजुरीपासून वंचित असलेल्या उपोषण कर्त्यांनी हे पत्र घेण्यास नकार देवून नगदी स्वरुपात मजुरीची रक्कम उपविभागीय अधिकारी घाडगे अथवा तहसीलदार झाडके यांनी स्वता: उपोषणस्थळी भेटून समस्या सोडवावी. अन्यथा आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्ही घरी उपाशीच आहोत..येथेसुद्धा उपाशीपोटी राहू असे त्या कर्मचार्यास ठणकावून सांगितल्याने सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची धडधडी वाढली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी