मूर्तीची प्रतिष्ठापना

माता चिंदलदेवी मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मत चिंदल देवीच्या नियोजित जागेवर दि.०८ सोमवारी पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत माता चिंदलदेवी मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पोतराज व मोठ्या प्रमाणात महिला मंडळाची उपस्थिती होती. 

सवना रेल्वे गेटजवळ असलेल्या संजय नरवाडे यांच्या शेताच्या धुऱ्यावर लिंबाच्या झाडाजवळ गत अनेक वर्षापासून चिंदल देवीची नवीन कपडा, हळदी कुंकवाने पूजा अर्चना केली जाते. या ठिकाणी चिंदल देवी मातेची मूर्ती उभारली जावी अशी भक्तांची इच्छा होती. यासाठी मागील महिन्यापूर्वी समिती नेमून अध्यक्षपदी सौ लक्ष्मीबाई गड्डमवार, उपाध्यक्ष संजय नरवाडे, सचिव पदी बाब्राव शिंदे पाटील यांची निवड करण्यात आली होती. या समितीच्या पदाधिकार्यांच्या पुढाकारातून निधी संकलन करण्यात येवून भोकर येथील मूर्तिकार तुळशीराम येताळकर यांच्या हस्ते बनविण्यात आलेली मूर्ती येथे आणण्यात आली. दि.०८ सोमवारच्या शुभ मुहूर्तावर वेदशास्त्र संपन्न पुरोहित वसंत कळसे यांच्या मधुर वाणीतील मंत्रोचाराने आदिलाबाद येथील देवकरीनबाई सौ.सुनंदाबाई यांच्या हस्ते महाभिषेक, पूजा अर्चना करण्यात आली तसेच रात्रभर पोतराज पापय्या गायकवाड, कोत्तलवाडी, यांनी व त्यांच्या संचानी हलगीच्या तालावर भक्तिगीते म्हणून मातेचा जागर केला. त्यानंतर मातेच्या मूर्तीची वाजत गाजत शहरातील मुख्य रस्त्यावरून सर्व देव - देविकांचे दर्शन घेत भव्य शोभा यात्रा काढण्यात येवून सायंकाळी ५.३० वाजता विधिवत मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून मूर्ती विजमान करण्यात आली. लगेच  भव्य महाप्रसादाने कार्याक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध ठिकाणचे मान्यवर, नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी