थंडीचा कडाका

थंडीचा कडाका कायम असल्याने मनुष्यासह प्राणी मात्र हैराण

हिमायतनगर(अनिल मादसवार)गत आठ दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने मनुष्यासह प्राणी मात्र हैराण झाले आहेत. परिणामी सकाळच्या सुर्यकिरणाचा उबदारपणा घेण्यासाठी वन्य प्राणी मोकळय जागेवर गर्दी करताना तर मनुष्य शेकोट्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.

हल्ली हिमायतनगर थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सध्याचे तापमान १६ अंशावर असून, सायंकाळी पाच वाजेपासूनच हुडहुडी भरायला सुरुवात होऊ लागली असून, जिकडे - तिकडे मनुष्य शेकोट्यावर भर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण उबदार वस्त्रांचा पेहराव करून घराच्या बाहेर पडत आहेत. गरम आणि उबदार कपड्यांचे आच्छादन घालून फिरणारा मनुष्यप्राणी थंडीपासून बचाव करीत आहे. परंतु रात्रंदिवस जंगलात आणि उघड्यावर फिरणार प्राणी हरिणाचे कलप, वानरांची टोळी, मोरांचे थवे, चिमण्यांचे थवे, सकाळी सह वाजल्यापासून सूर्याच्या कोवळ्या किरणासाठी उघड्यावर रानावनात गर्दी करताना दिसून येत आहेत. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सूर्याच्या उबदार किरणांचा मोह वन्य प्रण्यानाही आवरता येत नसल्याने निसर्गाने प्रदान केलेल्या उन्हाचा आनंद घेताना अनेक वन्यप्राणी फेरफटका मारताना दिसून येत आहेत. गत १५ दिवसापासून थंडीत वाढ होत असून, याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याने शेतकर्यांना उत्पादन वाढीची अशा वाढली आहे. परंतु जमिनीतील पाणी पटली खोल जात असल्याने चिंतेत भर पडली हे विशेष... 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी