दुष्काळग्रस्त




हिमायतनगर(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेली निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात प्रभाव करणारी ठरली आहे. परिणामी बळीराजा आर्थिक कोंडीत सापडल्याने आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा प्रकार रोकण्यासाठी शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकर्यांना ५० हजार प्रती हेक्टरी मदत द्यावी अशी आग्रही मागणी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार शरद झाडके यांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युव्हात अडकत आहे. या वर्षी तर १९७२ चे रेकोर्ड ब्रेक करणारा काळ ठरला असून, पावसाची अवकृपा व अनियमितता यामुळे शेतकरी पुरतः अडचणीत आला आहे. पहिली पेरणी वय गेली, दुसर्यांदा केली त्यातही अर्धी झाडे, वळून गेली तिसर्यांद पेरणी केली, तर उत्पादन घटले. अश्या नुकसानदायक परिस्थितीने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परिणामी या संकटातून कसे वाचावे याची चिंता करताना निघालेल्या उतपादना हमी भाव मिळत नसल्याने पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. हिवाळ्यात थंडी गायब झाल्याने व महावितरण कंपनीच्या सुलतानी कारभाराने रब्बी पिकाचा सुद्धा भरोसा राहिला नाही. बैन्केचे कर्ज व साहुकारांचे देणे आणि आगामी काळातील जीवन कसे जगावे या विवंचनेतील शेतकर्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. या भयंकर दुष्काळी संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. शेतकर्यांना प्रती हेक्टरी ५० हजारची मदत जाहीर करावी, जवखेडातील दलित हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांचे वीज बिल व पिक कर्ज सरसकट माफ करावे, टाकळी बंधार्यावार्यावरील विद्दुत मोटारीचे कनेक्शन तोडू नये, कापसाला प्रती कुंटल ७ हजार व सोयाबीनला प्रती कुंटल ५ हजार भाव द्यावा. शेतकर्यांवरील कर्जाची केली जात असलेली वसुलीची सक्ती थांबवावी, इसापूर धारांचे पाणी पैनगंगा नदीत सोडून शेतकरी, नागरिक व जनावरांच्या पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सोडवावा. तसेच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यात धरणाचे पाणी सोडून जवळगाव, टेंभूर्णीच्या टोकापर्यंत पोन्चून पिकन जीवदान द्यावे, तालुक्यातील सर्व वाडी - तांड्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून मजुरांचे स्थलांतर थांबवावे, तालुक्यातील सर्व कर्मचार्यांना मुख्यालाई राहण्यास बंधनकारक करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, नवीन दारिद्र्य रेषेतील यादीची तत्काळ प्रसिद्धी करून दारिद्र्य निर्मुलनास मदत करावी, हिमायतनगर रेल्वे स्थानक व नांदेड - किनवट रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यास मंजुरी देवून तत्काळ काम सुरु करावे, तालुक्यातील रस्त्याची प्रलंबित कामे तत्काळ सुरु करून गैरसोय टाळावी, संजय गंदी, वृद्धापकाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित अनुदान सुरु करावे यासह अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर माजी आमदार माधवराव पाटील, जी.प.सदस्य सुभाष राठोड, शे.रेहाना बेगम, सौ.गोपिकाबाई मजळकर, वस्त कारखान्याचे उपाध्यक्ष पंडित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, उपसभापती परसराम पवार, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, जनार्धन ताडेवाड, गणेश शिंदे, विजय शिंदे, सुभाष शिंदे, लक्ष्मीबाई भवरे, उज्ज्वला बिच्चेवार, वामन वानखेडे, अब्दुल्ला भाई, पंडित रावते, विठ्ठलराव वानखेडे, संजय माने, पापा पार्डीकर, दिगंबर काळे, फेरोज कुरेशी, आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

अंतुले यांना श्रद्धांजली
-------------
तसेच यावेळी माजी मुख्यमंत्री तथा बैरीस्टर ए.आर.अंतुले यांना काँग्रेस कमेटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस माजी आमदार माधवराव पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी