गतिरोधक बसवा...

कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवा...
पालक -नागरिकांची मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील गजबजलेल्या व राहाद्दरीच्या ठिकाणावर असलेल्या जी.प.कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवून संभाव्य अपघात टाळण्याची विनंती येथील युवक व पालकांनी ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

बसस्थानक परिसर रस्त्यावर इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची शाळा व अंगणवाडी आहे. याच रस्त्यावर परमेश्वर मंदिर, रेल्वे स्थानक, व अन्य शाळा कोलेज असून, विदर्भ - मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याने अन्य गावाला जाणार्या वाहनांची मोठी वर्दळ असते. शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींची तोबा गर्दी होते. या रस्त्याची रुंदी कमी असल्याने भरधाव वेगत येणाऱ्या -जाणार्या वाहनामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून, या ठिकाणच्या शाळेजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. परंतु या प्रमुख मागणीकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून, केवळ स्वार्थ असलेल्या रस्ता कामाकडे जास्त लक्ष दिले जात आहे. परिणामी येथील कन्या शाळेजवळ अपघात होण्याची शक्यता बळावली असून, तत्काला शाळेसमोर दोन ठिकाणी गतिरोधक बसवून संभाव्य अपघात टाळावा, तसेच शाळेत ये - जा करणर्या मुलीना व वृद्ध बालकांना होणारा अडथळा दूर करावा. अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावरही उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. यावर गजानन हरडपकर, राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, परमेश्वर सातव, विनोद आरेपल्लू, विलास वानखेडे, अनिल ढोणे, निळू  पवार, व्यंकटेश मोतेवार, जगदीश चलमेलवार, परमेश्वर जाधव, मधुकर चव्हाण, महेश अम्बीलगे, भास्कर चिंतावार, खंडू चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रतिक ठाकरे, रामराव देवसरकर, दिलीप डाके, किशन ढोणे, परसराम फुलके, आदीसह अनेक युवकांच्या स्वाक्षर्या आहेत.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी