पूरस्काराने सन्मानित

उल्लेखनीय कार्य करणार्यांना पूरस्काराने सन्मानित करण्याजोगे कार्यक्रम राबवावे - गौतमी कांबळे 


हिमायतनगर(वार्ताहर)विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा पुरस्काराने सन्मान करण्याचे कौतुकास्पद काम भवरे कुटुंबियांकडून केले गेले हि बाब अभिनंदनीय आहे. ज्या व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान झाला त्याना नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळते म्हणून समाजात चांगले काम करणार्यांना विविध संस्था व शासनाने पूरस्काराने सन्मानित करण्याजोगे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माहूरच्या नगराध्यक्ष कु.गौतमी कांबळे यांनी व्यक्त केले. त्या हिमायतनगर येथे स्मृतिशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहु उद्देशीय सेवाभावी संस्था, सा.वारसदार व बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शाहीर व कलावंतांच्या मेळाव्यात गुरुवर्य एम.पी.भवरे (कामारीकर) स्मृती पुरस्काराचे वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होत्या. 

सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर मंदिर संस्थांचे जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.सदस्य रमेश सरोदे, प.स.उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, गटशिक्षण अधिकारी एस.एस.सुरजुसे, एम.एम.पांचाल, बी,जी.कावळे, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकर तमनबोइनवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी सभापती माणिक लोहगावे, नायगावचे माधव मामा कोकुरले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, प्रीतम जोंधळे, साहेबराव नरवाडे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्तेचे विजय नरवाडे, हिमायतनगर पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष कानबा पोपलवार, आदींसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी कु.गौतमी कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम शाहीर चंद्रकांत धोटे यांच्या स्वागत गीतासह नृत्य दिग्दर्शक प्रा.गणेश वानसागर यांच्या नटरंग नृत्याने कार्यक्रमास रंगत आली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सुमनबाई मारोतीराव भवरे, संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, सौ.उज्ज्वला भवरे, दिलीप कावळे, दिपाली कावळे, स्वागताध्यक्ष बालाजी राठोड, निमंत्रक डॉ.मनोज राउत, आयोजक लक्ष्मण भवरे, कु.दिपाली बोंडलेवाड यांच्या हस्ते हास्य सम्राट शीलवंत वाढावे, वनाधिकारी के.डी.देशमुख, मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, डॉ.पी.बी.नामवाड, शैलेंद्र वडजकर, नागराज कांबळे, सौ.महादेवी मठपती यांना गुरुवर्य एम.पी.भवरे (कामारीकर) स्मृती पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. तर शाहीर व्यंकट बेटकबिलोलीकर, प्रा.गणेश वनसागर, जगन शेळके, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, आकाशवाणी कलावंत दिलीप वंजारे, शाहीर बाबुराव गाडेकर, शाहीर मोतीराम कांबळे, वामनदादाकार अशोक एडके, सचिन कांबळे, शाहीर रमेश नार्लेवाड, शाहीर बळीराम जाधव, यांना विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना कु.कांबळे म्हणाल्या कि, ग्रामीण भागात विविध प्रकारचे लोककलावंत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या कलेला वाव मिळत नाही हि खेदाची बाब असून, या कलावंताना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन असे आश्वासन उपस्थितांना बोलताना दिले. यावेळी उपस्थित कलावंताना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील नायेगाव, उमरी, भोकर, किनवट, माहूर, कंधार, हदगाव, आदी तालुकायासह जिल्हाभरातील कलावंत, शाहीर, पत्रकार व हिमायतनगर येथील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशवी करण्यासाठी जगन्नाथ नरवाडे, दिलीप भवरे, विजयेंद्र सरपे, शाहीर सुभाष गुंडेकर, शे.खायुम, गणेश राउत, पाशा, खातीब, बापूराव कदम, यशवंत थोरात, किरण वाघमारे, प्रल्हाद पवार, दाऊ सूर्यवंशी, संघरत्न भवरे, राहुल लोने, दत्ता गडलवार, अशोक आळने, शाहीर नरेंद्र दोराटे, धम्मा कांबळे, सुर्यकांत खिराडे, आदींनी परिश्रम  घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी