नदी व कालव्यात पाणी

२५ डिसेंबर पर्यंत नदी व कालव्यात पाणी येणार... नागेश पाटील आष्टीकर

हिमायतनगर(वार्ताहर)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत व उपकालव्यात येत्या २५ डिसेंबर पर्यंत पाणी येणार असून, जनावरांना व रब्बीच्या ओइकन त्याचा फायदा होईल. असे उद्गार आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी काढले ते, तालुक्यातील विरसनी, दिघी, वाघी येथील ग्रामस्थ व शेतकर्यांना बोलताना काढले. 

सध्या हिमायतनगर सह तालुक्यातील अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी कोरडी पडल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्यांना व नदीकाठावरील गावकर्यांना पाणी टंचाईच्या झाला सोसाव्या  लागत आहेत. तसेच उर्ध्व पैनगंगा कालव्यात सोडलेलं पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोन्चत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात आली आहेत. हि बाब लक्षात घेता मागील ५२ दिवसापूर्वी पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे व उजव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोन्चवे अशी मागणी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे केली होती. तर कालव्याच्या कामावर कार्यरत अधिकार्यांना तश्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून जिल्हाधिकार्यांनी या बाबतची गंभीरतेने दाखल घेवून संबंधित विभागांना सुचित केल्याने इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी येत्या २५ डिसेंबर पर्यंत कालव्याच्या टोकापर्यंत व पैनगंगा नदीत येईल अशी माहिती आ.नागेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. तसेच यावेळी काहींनी कालव्याचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ ध्वजारोहनाला येतात, त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो असे सांगितले. यावरून लगेच येथे उपस्थित अधिकार्यांना खडसावत आजवर झाले ते झाले यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही. असे सुचित करून पडझड झालेल्या कालव्याची दुरुस्ती व वाढलेली झाडे झुडपे तोडून आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्येवर आताच उपाय करा असे सुचित केले. यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे, यावर मात करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आगामी काळातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगीतल्याने ग्रामस्थांना विकास व गरजू समस्यांचा निपटारा होईल अशी अशा वाढली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी