काम ग्रामस्थांनी केले बंद



हिमायतनगर(वार्ताहर)बांधकाम विभागाच्या उपाभियांता यांनी रस्त्याचे काम बंद करण्याच्या सूचना देवूनही संबंधित गुत्तेदाराने निकृष्ठ पद्धतीच्या माटेरीयल द्वारेच काम करण्याचा सपाटा आता रात्रीला सुरू केला. हि बाब समजताच ग्रामस्थांनी सदरच्या कामावर जावून काम बंद पडल्याने गुत्तेदाराच्या निकृष्ठ कामाचे मनसुबे उधळले आहे. 

हिमायतनगर तालुक्यात गत पंचवार्षिक वर्षात टक्केवारी देवून गुत्तेदारी करणे, शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत राजकीय वरदहस्त व अभियंत्याशी मिलीभगत करून निकृष्ठ कामाचा सपाटा लावणारे पांढरपेशी गुत्तेदार जास्त प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच कोणी - कितीही तक्रारी करो आमचा काहीच वाकडे होत नाही या तोर्यात डांबरी, सिमेंट रस्ते, बंधारे, नाली बांधकाम, यासह सभागृह, शालाखोली इमारती, रस्ते दुरुस्ती आदीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. परिणामी करण्यात आलेल्या बहुतांश कामाची सहा महिने ते वर्षभरातच वाट लागली आहे. आजूनही तश्याचा गुत्तेदाराना रस्त्याची कामे दिली जात असल्याने शासनाचा निधी पुन्हा अभियंते व गुत्तेदाराच्या घश्यात उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी. येथे जी.प.सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाकडून कार्ला फाटा ते कारला पी. अश्या रस्त्याचे काम गत आठ दिवसापूर्वी सुरु करण्यात आले आहे. या डांबरी रस्त्यासाठी जवळपास १४ लाखाचा निधी मंजूर असून, हे काम राजकीय वरदहस्त असलेल्या एका गुत्तेदार माफत केले जात आहे. सदर कामात विहिर खोदकामातून निघालेल्या हिरावत रंगाच्या मांजर्या मुरुमासारख्या दगडाचा वापर केला जात आहे. या बाबतची माहिती मिळाल्यावरून दि. २७ रोजी वर्तमान पत्रातून कारला पी रस्त्याच्या कामात मुरुमाड दगडाचा वापर..चौकशीची मागणी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सदर वृत्ताची दखल घेत संबंधित गुत्तेदारास काम बंद करून सदर दगड बदलण्याच्या सूचना उपअभियंता श्री मुंडे यांनी दिले होते. परंतु सहाय्यक अभियंता श्री मुधोळकर यांच्या आशीर्वादाने व लालची प्रवृत्तीने गुत्तेदारांचे फावत असून, शासनाचा लाखो रुपयाचा निधी गुत्तेदार आणि अभियंते संगनमताने गिळंकृत करीत आहेत. 

संबंधी काम बंद करण्याच्या सूचना दिल्या असतानानी रात्रीला जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करून लाखो रुपयाचा रस्ता कामात अंदाजपत्रकाला बगल देवून करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्या तोंडाला चांगला दगड व मधील भागाकडे मुरमाड दगडाचा वापर करत रातोरात तयार करण्याचा चंग गुत्तेदाराने बांधल्याचे दिसून येत आहे. या पूर्वीही सदर गुत्तेदाराने राजकीय वरदहस्ताने अनेक रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची केली असून, संबंधित कामाची गुणवत्ता आजघडीला ढासळली आहे. त्या कामांची सुद्धा गुण नियंत्रक मापक मशीनद्वारे वरिष्ठांनी चौकशी केल्यास गुत्तेदार मालामाल कसे झाले याचे सत्य समोर येईल. 

याबाबत जी.प.बांधकामचे उपअभीयंता श्री मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी सहाय्यक अभियंता मुधोळकर यांना काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच निकृष्ठ पद्धतीचे हिरव्या रंगाचा दगड वापरू नये व माझ्या भेटीपर्यंत तसाच ठेवावा अश्या सूचना दिल्या आहेत. यावरही संबंधिताने माझ्या आदेशाशिवाय काम सुरु करून केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

कार्ला रस्त्याचे काम ग्रामस्थांनी केले काम बंद 
----------------------- 
निकृष्ठ पद्धतीच्या दगडाचा वापर रस्त्याचे कामावर केला जात असल्याने आणि काम बंद करणाच्या सूचन देवूनही रातो- रात काम करण्याचा प्रयत्न गुत्तेदाराकडून केला जात असल्याचे समजताच दि.०१ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी सदरचे काम बंद केले आहे. त्यामुळे गुत्तेदाराची व सहाय्यक अभियंताची पंचायत झाली असून, जोपर्यंत निकृष्ठ दगड बदलून कामाचा दर्जा सुधारला जात नाही तोपर्यंत काम सुरु करू देणार नाही असा इशारा माजी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष नागेसेन गोखले, विद्यमान सरपंच रामेश्वर यमजल वाड, गौतम घोडगे, बालाजी मोरे, छोटू भाई, राम मिराशे, भीमराव लुम्दे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते. 

बदनाम केले जात असल्याने नाराजी 
------------------------------ 
तालुक्यातील मौजे कार्ला पी.ते कार्ला फाटा या रस्त्याच्या कामात मुरमाड दगडाचा वापर.. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच गुत्तेदार व त्यांच्या समर्थकांचे पित्त खवळले असून, आपल्या समर्थकाकरवी पत्रकारांची मर्जी सांभाळली नाही म्हणून बातम्या प्रकाशित केल्या जात असल्याचे डांगोरा पिटविला जात आहे. निकृष्ठ काम करून शासन व जनतेला गंडविणाऱ्याकडून चोरांच्या उलट्याबोंब या सारखा प्रकार सुरु केल्याने पत्रकार संघटनेकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी