शेतकरी जखमी

हिमायतनगर(वार्ताहर)सीरंजनी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना दि.२७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेत सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीरंजनी येथील शेतकरी रामा जळबा बम्मलवाड वय ५५ वर्ष हे नेहमीप्रमाणे शेतातील कापसाच्या व रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यसाठी विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. दरम्यान परिसरातील झाडा झुडपात दाबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात शेतकऱ्याच्या उजव्या हाताला व गालाला वन्य प्राण्याने चावा घेतला. आरडा ओरडा करताच परिसरातील शेतकरी धावून आल्याने रानडुकराने घटना स्थळावरून धूम ठोकली. या घटनेत भयभीत होऊन गंभीर जखमी झालेल्या शेतकर्यास नागरिकांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी श्री डी.डी.गायकवाड यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर केले आहे. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री वाकोडे यांनी रुग्णालयातील जखमी शेतकर्याची भेट घेवून आस्थेवाईकपने चौकशी केली. तसेच त्यांना वनविभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी