तापाने फणफणला



हिमायतनगर(अनिल मादसवार)कोरड्या दुष्काळाने त्रस्त झालेला हिमायतनगर तालुका पुन्हा आता ताप आणि साथीच्या आजारांनी फणफणत आहे . गेले आठ त दहा दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाने तथा जागोजागी तुंबलेल्या नाल्याचे साचलेले पाणी घाणीमुळे साथीचे रोग पसरू लागले आहेत. तापाच्या साथीने रोज सुमारे ५० ते ८० पेशंट सरकारी हॉस्पिटल मध्ये ओपीडीत उपचार घेत आहेत. त्यापैकी ३५ ते ४० जणांची रक्त तपासणी करून उपचार केले जात आहेत. तर खासगी दवाखान्यांतील पेशंटांची संख्या न मोजण्यापलीकडची आहे. दाखलपैकी आठवडाभरात हजारो पेशंट्सवर उपचार करून त्यांना घरी पाठविल्याची माहिती सरकारी रुग्णालयांमधील सूत्रांनी दिली आहे. यात सर्दी - ताप, डेंगू सदृश्य, मलेरिया, न्यूमोनियाच्या जोडीला डायरियाचेही रुग्णांचा समावेश आहे.

गत आठवड्यापासून गुलाबी थंडी बरोबर, उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साचलेल्या तथा घाणीच्या साम्राज्याने शहर व ग्रामीण परिसरात साठीचे आजार पसरत आहेत. विविध आजाराचे रुग्णांची संख्या एवढी आहे कि, खासगी रुग्णालयातील गर्दी उरात धडकी भरविणारी आहे. शहरासह तालुक्यातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीने कुठल्या ना कुठल्या आजाराने खाट पकडली आहे. सर्दी, खोकला, उलट्या, पोट दुखी, जुलाब डोळे येणे अशा असंख्य व्याधींच्या विळख्यात हिमायतनगर तालुका सापडला आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्या, मेंदूज्वर, मेनेनजोइंटीस असे कितीतरी तापीचे आजार आहेत. कोणत्या तापाचा कोणता रुग्ण आहे, हे डॉक्टरांनाही तात्काळ ओळखणे कठीण झाले असल्याने लवकर उपचार होत नाही. परिणामी अनेकांना नांदेड गाठावे लागत आहे.

शहरातील दवाखाने ताप अन् ‌साथीच्या आजाराने हाउसफुल्ल झाले आहेत. तापाने फणफणलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. उपचारांसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, पालिकेची आरोग्य केंद्र तसेच खासगी दवाखान्यांमध्ये सकाळच्या प्रहरी रांगा लावत आहेत. सकाळी थंडी, दुपारी उन, दिवसभर ढगाळ वातावरण, सायंकाळी पुन्हा थंडी असे सध्याचे वातावरण आहे. त्याच्याशी जुळवून घेणे लहान मुलांना शक्य होत नाही. परिणामी शून्य ते आठ वर्षे वयोगटातील मुले या बदलत्या वातावरणामुळे आजारी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शनिवारी रुग्णालयात पाहणीसाठी काही शिवसनेचे व पत्रकार ग्रामीण रुग्णालयात गेले असता केवळ एकच वैद्यकीय अधिकारी व काही महिला - पुरुष कर्मचारी उपचार करताना दिसले. रुग्णांची गर्दी झालेली होती, परंतु वैद्यकीय अधीक्षक गाडेकर मात्र नजरेस पडले नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी