बस सुरु..



हिमायतनगर(वार्ताहर)उमरखेड - बोरी - हिमायतनगर आणि उमरखेड - ढाणकी - हिमायतनगर असा टापोटाप रस्ता सुरु असताना देखील उमरखेड आगाराने अद्यापपर्यंत बस सेवा सुरु केली नाही. याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने प्रकाशित करताच उमरखेड आगाराने बस सुरु केल्याने प्रवाशी वर्गातून नांदेड न्युज लाइव्हचे धन्यवाद मानले जात आहेत.

मागील पाच वर्षापूर्वी विदर्भ - आंध्रप्रदेश मार्ग जोडण्यासाठी कोट्यावधी रुपयातून पंतप्रधान ग्रामसडक योजेच्या माध्यमातून हिमायतनगर - डोल्हारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. तर बोरी मार्गावरील भव्य अश्या पुलाचे कामही संपुष्टात आले आहे. परंतु या जोड रस्त्यावर अद्याप कायमस्वरूपी बससेवा सुरु झाली नाही. हि बाब अनेक वेळा परिसरातील सत्ताधारी नेत्यांच्या निदर्शनास ग्रामस्त व प्रवाश्यांनी आणून दिली होती. मात्र कमी खर्चात मिळणाऱ्या नागरिकांच्या या प्रमुख समस्येकडे संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेले आहे. म्हणून दसर्यानंतर बस सेवा सुरु होऊन अवघ्या सहा महिन्यात पावसाळ्याच्या तोंडावर हि बस बंद होते.

हिमायतनगर शहराची बाजारपेठ मोठी आहे, त्यातच या ठिकाणच्या श्री परमेश्वर मंदिराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने दररोज या ठिकाणी येणाऱ्या - जाणार्यांची संख्या मोठी असते. हि बाब लक्षात घेता तसेच दळण - वळणाच्या मध्य मार्ग म्हणून मागील अनेक वर्षापासून उमरखेड आगाराच्या वतीने विदर्भ - मराठवाड्यातील जनतेच्या सुविधेसाठी पावसाळा संपल्यानंतर बससेवा सुरु करून, गैरसोय दूर केली जात होती. परंतु २०१४ वर्ष सुरु झाले तर पावसाळा संपून हिवाळ्याचे दिवस संपण्याच्या मार्गावर असताना देखील उमरखेड आगाराने हिमायतनगर - उमरखेड बस सेवा सुरु केली नाही. परिणामी विदर्भातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी नाईलाजास्तव अवैध्य प्रवाशी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. उमरखेड आगर प्रमुखाचा मनमानी कारभार..बस सुरु करण्यात टाळाटाळ..अश्या आशयाचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने गत महिन्यात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत उमरखेड आगार प्रमुख व्यवहारे व वाहतूक निरीक्षक राठोड यांनी ३१ अक्टोबर २०१४ पासून उमरखेड - ढाणकी - हिमायतनगर अशी बस सुरु केली आहे. शुक्रवारी दुपारी हिमायतनगर शहरात बसेचे आगमन झाल्यानंतर अनेकांनी चालक दिगंबर पिलवंडे आणि वाहक फाळके यांचे स्वागत केले आहे. या बसमुळे गैरसोय दूर झाली असून, प्रवाश्यांना कमी खर्चातील प्रवासाची सोय झाल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे. सदर बस हि उमरखेड - ढाणकी - गांजेगाव - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर बस स्थानक व रेल्वे स्थानक अशी चालविली जात आहे. त्यामुळे विदर्भातील भाविक भक्त, नागरिकांना तिरुपती, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद, नांदेडसह अन्य ठिकाणच्या तीर्थ स्थळी जाण्यासाठी कमी खर्चातील मार्ग सुखकर होणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी