ग्रामीण रुग्णालयात सुविधांची बोंबाबोंब



ग्रामीण रुग्णालयात सुविधांची बोंबाबोंब... 

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील आरोग्य सुविधेकडे जबाबदार वैद्यकीय अधीक्षकाचेच अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सुविधेची बोंबाबोंब झाली आहे. परिणामी साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या गोर - गरीब जनतेला खाजगी रुग्णालयात जावून महागडा उपचार घ्यावा लागत आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून सामान्य जनतेच्या आरोग्याची होत असलेली वाताहत थांबविन्याकडे हदगाव - हिमायतनगरचे आ.नागेश पाटील आष्टीकर, लातूरचे आरोग्य उपसंचालक श्री पाटील, नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री कंदेवाड, अशी मागणी शहर व ग्रामीण भागातील आरोग्यप्रेमी नागरीकातून केली जात आहे. 

मागील काळातील राजकीय नेत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तथा अप - डाऊन करणाऱ्या व स्थानिक निवासी न राहता मनमानी कारभार करणाऱ्या अधिकार्यांना अभय दिल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा ढासळली आहे. नव्याने उद्घाटन झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमुळे सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळेल असे वाटत होते. परंतु हे साफ खोटे ठरले असून, परंतु सध्या तरी या ठिकाणी रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाणी, विद्दुत गुल झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याने रात्रीला अंधाराचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी असलेले महिला - पुरुषाचे शौच्चालय नेहमीच कुलुपबंद राहत आहे. तसेच उपचारार्थी रुग्णासाठी असलेल्या कॉटवरील सर्व सुविधा रुग्णांना मिळत नाहीत. गोर - गरीब रुग्णांना मोफत उपचार व औषधीची सोय शासनाने केलेली असताना बहुतांश औषधी सुद्धा बाहेरून आणावी लागत असून, १०८ नंबरच्या गाडीची सुविधा गरजू रुग्णांना मिळत नसल्याने ग्रामीण रुग्णालय असून, अडचण नसून खोळंबा असा प्रत्यय उपचारासाठी आलेल्या नागरिकांना येत आहे. परिणामी कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेली ग्रामीण रुग्णालयाची टोलेजंग इमारत राजकीय नेते, अभियंते व गुत्तेदाराच्या फायद्यासाठी बांधण्यात आली कि काय..? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकमधून केला जात आहे. 

सध्या तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, डेंग्यू, डायरिया, सर्दी - खोकला आदि आजारच्या साथीने थैमान घातले असून, सर्व सामान्य जनतेत या आजराबाबत जनजागृती केल्या गेली नसल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच संबंधित ग्राम पंचायतीने धूर फवारणी, नाली सफाई, गावातील स्वच्छता तसेच गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी म्हणावे तसे परिश्रम घेलते नसल्याने गाव - गावातील घर घरात तापीसह अन्य आजाराची लागण झाली. असल्याने खाजगी व सरकारी दवाखाने रुग्णांच्या संखेने खाच्चाखच्च भरलेले दिसत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याची ओरड शासकीय सेवेपासून वंचित असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकानि पत्रकारांसमक्ष केली आहे. 

येथील ग्रामीण रुग्णालयात एकूण २६ मान्य पदे असून, त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक -०१, वैद्यकीय अधिकारी - ३, अधिपरिचारिका - ७ पैकी १ रिक्त, परिचारिका - १ रिक्त, औषध निर्माता - १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ -१, एक्सरे टेक्निशियन -१ रिक्त, वाहन चालक -१, सहाय्यक अधीक्षक -१, कनिष्ठ लिपिक -२, आदींसह शिपाई, चालक, सेवक व सफाई कामगार आदी पदांची रुग्णालयात मान्यता आहे. काही पदे सोडली तर जवळपास सर्वच पदे भरलेली असून, जबाबदार वैद्यकीय अधीक्षक म्हणून श्री गाडेकर यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु सदर महाशय सुद्धा आठवड्यातून अनेक दिवस गैरहजर राहत असल्याने रुग्णांना आर्थिक झळ व गैरसोईचा सामना करावा लागत आहे. नयुक्त तीन वैद्यकीय अधिकार्यापैकी एका डॉक्टरांनी आपला कारभार जुन्यारुग्णालया प्रमाणेच सुरु ठेवला तर एका अधिकार्याने राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार फक्त डॉ. डी.डी.गायकवाड या एकाच वैद्यकीय अधिकार्यावर अवलंबून असल्याने गरजू रुग्णांना सेवा देण्यास ते अपुरे पडत आहेत. 

वैद्यकीय अधीक्षकांचा हकालपट्टी करावी 
------------------------------------ 
येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहणारे वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर हे खुद्द नांदेडहून ये - जा करत आहेत. तसेच आठ ते सहा दिवसांनी एकदा हिमायतनगरच्या रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाची मोफतची आरोग्य सेवेचा पुरेपूर फायदा मिळत नाही. परिणामी गोर- गरिबांना खाजगी रुगणालयात जावून महागडा उपचार करावा लागत आहे. रुग्णालयात अनुपस्थित रहात असल्याने विचारणा करणार्या नागरिकांना उर्मटपणाची उत्तरे देऊन मी नेहमीच उपस्थित राहून काम करतो. असे दाखवीत खोटारडेपणाचा आव आणणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक गाडेकर यांची हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाच्या पदावून हकालपट्टी करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी शहर व ग्रामीण भागातील रुग्णांनी आ. नागेश पाटील यांच्याकडे केली आहे. 

आ.महोदयांनी बैठक घेवून आरोग्य सुविधा मिळून द्याव्यात 
------------------------------------------ 
तातडीने हिमायतनगर तालुक्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचार्यांची बैठक आमदार महोदयांच्या उपस्थितीत हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात लावून आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात. यात सामान्य जनतेला अडचणी, असुविधा मांडण्याची संधी द्यावी. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरने, रुग्णांना सर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे. १०८ या गाडीची सुविधा सर्वाना समान पद्धतीने मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी जनतेची रास्त मागणी आहे.

याबाबत वैद्यकीय अधीक्षक गाडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता आपण डायल केलेला नंबर उत्तर देत नाही असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी