चारा - पाणी टंचाई

पैनगंगा कोरडी पडल्याने चारा - पाणी टंचाई वाढली


हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडी ठाक पडल्याने नदी काठावरील गावासह जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. 

नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावकर्यांना नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई चा सामना करावा लागत असून, नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील अनेक वर्षापासून नदीकाठावरील गावकर्यांना फेब्रुवारी - मार्च महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यंदा खरीप हंगामात वरून राजाने केलेली वाकृपा यामुळे दिवाळी पासूनच नदी काठावरील २० ते २५ गावकर्यांना भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चार्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी या प्रकारामुळे हतबल झाले असून, पाणी नाही चार नाही, म्हणून आपली जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत. बाजारातही जनावरान भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शासनाने अद्याप नुकसानीची मदत जाहीर केली नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. खरीपात म्हणावा तसा पावूस झाला नसल्याने रब्बीची पिके घेण्यासाठी जमिनीची कुवत नसल्याने रब्बीची सुधा अशा मावळली आहे. या परिस्थितीकडे पाहून शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी आणि शेतकर्यांना आर्थिक अडचणीतून सोडवावे अशी मागणी होत आहे.

नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे, तर जनावरांना जमा असलेल्या खड्ड्यातील पाणी पिवून आजारांना बळी पडावे लागत आहे. या परिस्थितीची जानवी लक्षात घेता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणी साठा पैनगंगा नदीत सोडून पाणी टंचाई ने त्रस्त झालेल्या मानवांसह मुक्या जनावरांना दिलासा द्यावा अशी मागणी नदीकाठावरील नागरिक शेतकरी करीत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी