अवैद्य पाणी उपसा सुरूच...

पोटा तलावातून अवैद्य पाणी उपसा सुरूच...
जिल्हाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी 


हिमायतनगर(वार्ताहर)सर्वत्र पाणी टंचाई सुरु असताना व राखीव पाण्याचा कोठा मृतावस्थेत गेला असताना देखील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील तलावातून राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या शेतकर्यांनी अवैद्यरित्या मोटारी चालवून बेसुमार पाण्याचा उपसा सुरु केला आहे. परिणामी आगामी काळात परिसरातील गाव, वाडी, तांड्यांना व मुक्या जनावरांना पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देवून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करूनही संबंधिताकडून पाण्याचा उपसा सुरुच असल्याचे म्हंटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा तलाव हे तेलंगाना- मराठवाड्याच्या सीमेच्या पायथ्यावर असून, मौजे वाई तांडा ग्राम पंचायती अंतर्गत येतो. या वर्षी खरीप हंगामात अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे तलावात २० टक्क्याच्या जवळ मृतसाठा असून, आगामी उन्हाळ्यातील काळात परिसरातील ५ ते ७ गाव, वाडी, तांड्यांना व जंगलातील पशु, प्राण्यांना पाणी टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सिंचन विभागाद्वारे  पाणी साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. मात्र या तलावातू काही राजकीय वरद हस्त असलेल्या विद्यमान तथा तत्कालीन पुढारी तथा शेतकर्यांनी या तलावातून मोटारपंपाद्वारे शेतीपिकासाठी पाण्याचा बेसुमार उपसा सुरु केला आहे. हि बाब ग्रामस्थांना समजताच या बाबतच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या. त्यावरून वाई येथील सर्पांचा मधुकर बद्दु राठोड यांनी अवैद्यरित्या सुरु असलेल्या पाणी उपसा बंद करून जनावरांना, पशु पक्षांना व गाववासियाना आगामी काळातील टंचाई पासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त कराव्यात अशी मागणी दि.२० अक्टोबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, तहसीलदार, सिंचन विभाग केनोल निरीक्षक, शाखा अभियंता भोकर यांच्याकडे केली होती. 

या तक्रारीवरून चार - पाच दिवसांनी पोटा सज्जाचे तलाठी रातोळीकर यांनी पोलिस पाटील मधुकर पवार यांच्या समस्क्ष तलावावरील मोटारींना सील लावून कार्यवाही केली होती. परंतु राजकीय बाळाचा वापर करत येथील काही बड्या शेतकर्यांनी महसूल विभागामार्फत लावण्यात आलेले मोटारीचे सील तोडून, विद्दुत पुरवठा खंडित असताना देखील जनरेटर, डीजेलपंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा सुरु केला आहे. या प्रकारामुळे तलावातील साठा कमी होऊ लागला असून, आगामी काळात पाणी संपल्यास जंगली श्वापदे गाव - कुशीत शिरकाव करून वाडी, तांड्यातील नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची संभावना आहे. पाण्याअभावी मुक्या जनावरांना, प्राणीमात्र व पक्षांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे काही गावकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. 

याबाबत अभियंता पत्तेवार यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि, तलावात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे, आमच्याकडे आलेल्या तक्रारीवरून आम्ही याबाबत विद्दुत मंडळ, तहसील  कार्यालय, पोलिस स्थानक यांना पत्राद्वारे सूचना देवून संबंधितावर कार्यवाही करण्याचे सुचित केले होते. त्यावरून विद्दुत मोटारीच्या पुरवठा खंडित झाला होता. तसेच आमच्या स्तरावर सुरु असलेल्या परवानाधारक व विना परवाना शेतकर्यांना नोटीस देवून मोटारी बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मोटारी बंद करण्याचे काम तहसीलदार यांचे आहे असे सांगून त्यांनी फोन बंद केला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी