इसापूर धरणातील पाणी पैनगंगेत सोडा



हिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव - हिमायतनगरच्या बोर्डरवरून वाहणाऱ्या पैनगंगेत पाणीसोडा अशी मागणी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे मुंबई येथून दूरध्वनीवरून केली आहे. त्यामुळे टंचाई ने होरपळनाऱ्या नागरिक व जनावरांना दिलास मिळणार आहे.

नुकतेच नांदेड न्युज लाइव्हने पैनगंगा नदी कोरडी पडल्याने चारा व पाणी टंचाई...शेतीपिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दाखल घेत हदगाव - हिमायतनगरचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुंबई येथील घडामोडी चालू असताना शेतकरी व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी वेळ काढून दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना चारा - पाणी समस्येबाबत अवगत करून देवून तातडीने या समस्येचे निराकरण करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी मागील आठ दिवसात दोन वेळा करून, पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी सुद्धा बातचीत केल्याचे सांगितले आहे. नागेश पाटील यांच्या मागणीवर इसापूर धरणावर कार्यरत अभियंत्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पाणी सोडण्यात येईल. धरणात पाणी साठा कमी आहे आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेत पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करता येईल असे जिल्हाधिकारी यानी सांगितल्याचे आमदार महोदयांनी म्हंटले आहे. तसेच गत खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानी बाबत नांदेड जिल्ह्यातील आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

मागील चार दिवसापूर्वी हिमायतनगर नदीकाठावरील शिष्टमंडळाने हिंगोली - नांदेडच्या खासदारांना भेटून जनावरांच्या पाणी व चार्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन तर दिलेच नाही उलट तुम्ही या आपण जिल्हाधिकार्यांना भेटून मागणी करू असे सांगितल्याल्याने शेतकरी निराश झाले होते. मात्र आमदार महोदयांनी चारा व पाणी टंचाई बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संभाषण केल्यामुळे नदीकाठावरील नागरिक व जनावरांचा प्रश्न सुटणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी