रंगली मैफिल

मेरे सर पे सदा.... 
यासह अनेक गाण्यांची खुले आम रंगली मैफिल



हिमायतनगर(अनिल मादसवार)मेरे सर पे सदा तेरा हात रहे..मेरे साई तू हमेशा मेरे साथ रहे...यासह अनेक सर्धार्मीय गीतांनी बस स्थानक परिसरात उघड्यावर मैफिल भरविली होती. ती नागपूरच्या रहेमान कुटुंबीयाने.

टीचभर पोटासाठी भटकंती करणाऱ्या रहेमान कुटुंबाने हिमायतनगर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करून अनेक हिंदी मराठी गाण्यांची मेजवानी हिमायतनगरकराना मोफत उपलब्ध करून दिली. मुलाच्या नागपूर येथील या कुटुंबाने पोटासाठी निवादाल्केल्या या व्यवसायाने मात्र वर्षातील आठ महिने त्यांना घराच्या बाहेरच जीवन कंठावे लागते. त्यातच मुलाबाळांच्या शिक्षणाचे आबाळ...भटकंतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या रहेमान कुटुंबातील मुलांचे भवितव्य मात्र अंधकारमयचं. वाजंत्री वाजविणे, संगीत शिकणे, गाणे म्हणणे, हाच एकमेव रहेमान परिवाराचा व्यवसाय असल्याने कुटुंबातील महिला सदस्यही त्यांना सहकार्य करत असतात. तबला, हार्मोनियम, झांझर, मृदुंग, आदी साहित्यासह सुरेल आवाजात गाणे म्हणून प्रेक्षकांची मने जिंकांर्या या कुटुंबाला प्रेक्षकही तेवढ्याच आपुलकीने दाद देताना दिसून येतात. गत दोन दिवसापासून सुरु असलेल्या या गीतांच्या कार्यक्रमात उमर में बाली..भोली भाली...शेर कि बेटी हुं... भिमाराजाकी बेटी हुं..मैं जी भीम वाली हुं.. मां शेरावाली... छत्रपतीच्या शुराविराने... दुनिया चलेना श्री राम के बिना.. रामजी चाले ना हनुमान के बिना...यासह अनेक गाणे भावगीतांना प्रेक्षणी टाळ्यांचा वर्षाव केला. 

अनेक भावगीत, भक्तीगीत, गजल, मराठी -हिंदी सिनेमांची गाणे गाऊन उदार निर्वाह करणाऱ्या कुटुंबाने शासनाने कलावंताकडे लक्ष देण्याची अपेक्षाही आहे. आपकी फरमाईश प्रेक्षकांच्या मागणीनुसार गीत गाऊन चार पैसे मिळविणे व उदार निर्वाह करणे हीच मात्र त्यांच्या जीवन जगण्याची कला होय..! असे म्हंटल्यास वावगे ठरणार आहे. 

याबाबत रहेमान यांना विचारणा केली असता, हि गाणे म्हणण्याची कला आम्ही आमच्या बाप दादा पासून शिकलेली आहे. अभ्यास व शिक्षण नसताना सर्व समावेशक गाण्यांमध्ये तरबेज असल्याने जनतेची कोणत्याही कोणत्याही गाण्याची फरमाईश आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. सर्वत्र भटकंती करताना अनेक अडचीन येतात मात्र न डगमगता घागडा चालविण्यासाठी आम्ही गीत गावून उदार निर्वाह करत, परंतु शासनाने आम्हा कलाकारांना राबविल्या जाणार्या योजनाचा लाभ मिळवून द्यावा अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी