तापीने मृत्यू



हिमायतनगर(वार्ताहर)तालुकयातील मौजे टेंभी येथील एका महिलेचा तापीच्या आजाराने नांदेड येथील एका खाजगी रुगणालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हि घटना गुरुवार दि.०६ रोजी घडली आहे. सदर महिलेचा मृत्यू डेंगू सदृश्य तापीच्या आजाराने झाल्याची चर्चा सुरु असून, वैद्यकीय विभागाने मात्र या बाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, टेंभी येथील मयत महिला कमलबाई पांडुरंग सुरजवाड वय ४५ या महिलेस मागील महिन्याभरापासून तापीच्या आजाराने ग्रासले होते. सुरुवातीला सदर महिलेने हिमायतनगर येथील खाजगी रुग्णालयात वेळोवेळी उपचार केले. मात्र काही केले तरी ताप काही कमी होत नव्हती, आजार वाढत असल्याने महिलेच्या कुटुंबाने तीस नांदेड एका खाजगी रुग्णालयात तीन दिवसापूर्वी दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरु असताना ताप कमी - अधिक होत असताना गुरुवारी सकाळी तापीच्या आजाराने सदर महिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे टेंभी गावात एकच खळबळ उडाली असून, या गावात आरोग्य विभागाच्या पथकाने जावून स्वच्छते बाबत नागरिकांना सतर्क करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीस बोलून दाखविले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील काही गावात सध्या तापीची साथ सुरु असून, सर्वात जास्त रुग्ण हे तापीच्या आजाराचे येत आहेत. तसेच सर्दी खोकला, डायरिया, डेंगू सदृश्य यासह अन्य आजाराची लागण झाली असून, हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. तालुक्यात साठीच्या आजारात वाढ होत असताना देखील संबंधित ग्राम पंचायतीच्या वतीने धूर फवारणी, तसेच नाल्याची सफाई, साचणारे घाण पाण्याची व्यवस्था लावली नसल्यामुळे मच्छरांची उत्पत्ती वाढून सामान्य नागरिकांना आजला बळी पडावे लागत आहे. या प्रकाराबाबत आरोग्य विभागाने सामान्य जनतेत सुरु असलेल्या डेंग्यूच्या आजाराबाबत नागरिकत जनजागृती केली तर या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळणार आहे.

या बाबत वैद्यकीय अधिकारी श्री बालाजी पोटेकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, या नावाची महिला आमच्याकडे आली नव्हती तरी देखील रुग्णालयातील नोंदणी रजिस्टर मध्ये पाहून माहिती देतो. सर्व नागरिकांनी देखील डेंगू - तापीच्या आजाराबाबत दक्षता घेत पिण्याचे व सांडपाण्याचे भांडे स्वच्छ धुवाने, साफ सफाई व खाद्य पदार्थ सुरक्षित ठेवणे आदीबाबत खबरदारी घ्यावी. कारण दिवसा चावणारे डास हे डेंगू - तापीचे असतात हे लक्षात घ्यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी