डेंगू बाबत जनजागृती

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील जी.प.उर्दू व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढून सध्या फोफावत असलेल्या डेंगू आजाराबाबत जनजागृती करून कोरडा दिवस पाळण्याचा संदेश दिला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात देण्गुच्या आजाराने डोके वर काढले असून, यामुळे अनेकांना आपला अनमोल प्राण गमवावा लागला आहे. हा आजार अस्वच्छ परिसर, घाणीचे साम्राज्य यामुळे पसरतो. डेंग्यू हा एका विषाणूमुळे होणारा आजार असून, एडीस इजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंगूचा वाढता प्रकोप लक्षात घेता याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशेने जिल्हाभरात जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील जी.प.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री असद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांची हाती फलक धरून प्रभात फेरी काढली.

यात विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, डेंग्यूचे नियंत्रण करण्यासाठी डासांची पैदास थाबाविण्यासाठी काळजी घ्या, परिसर स्वच्छता पाळा डेंगू टाळा, जो घर दार स्वच्छ करी तिथे आरोग्य वास करी, डेंगू पासून सावधान, स्वच्छता दिवस पाळा..आजार टाळा, डेंग्युपासून आपला बचाव करा यासह डेंगू आजाराबत अनेक घोषणा देत जनजागृती केली. हि प्रभात फेरी जी.प.शाळा ते बाजार चौक, चौपाटी, ग्रामीण रुग्णालय, आंबेडकर चौक परत जी.प.शाळेत परत येवून हात धुवा कार्यक्रम संपन्न करून समारोप झाला. सदर रेलीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पांचाळ, औषध निर्माता डॉ. सुचित मामीडवार, म.अहमद खान, परिचारिका वंदना रच्चावार, डॉ. राजेंद्र वानखेडे, जी.प. शाळेचे मोहसीन सर, सिराज सर, शेख तय्यब सर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी