२०० कुंटल गहू पकडला

हिमायतनगर येथील स्वस्त धान्याचा २०० कुंटल गहू काळ्या बाजारात जाताना पकडला 


हिमायतनगर/भोकर(वार्ताहर)मागील अनेक वर्षापासून पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने  हिमायतनगर येथून रेशनचा गहू लाभार्थ्यांना वितरीत न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होता. याबाबतची वृत्त वर्तमान पत्रातून प्रकाशित करताच भोकर पोलिस प्रशासनाने गुप्त पद्धतीने सापळा रचून दि.२८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास, अवैद्य विक्री करण्याच्या उद्देशाने आंध्रप्रदेशात जाणारा २०० कुंटल गव्हासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. हि कार्यवाही भोकर तालुक्यातील पाळज गावाजवळील रोडवर करण्यात आली. या घटनेमुळे धान्याचा कला बाजार करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली असून, सदर प्रकरण रफा - दफा करण्यासाठी राजकीय बळाचा वापर झाला. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यवाही केली खरी, परंतु धान्याचा काळा बाजार करणाऱ्या मुख्य मालकावर कार्यवाही न करता नौकरावर गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यवाहीबाबत उलट - सुलट चर्चा होत आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालविला जात आहे. त्यामुळे तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर शहर हे स्वस्त धान्याचा काळ्या बाजाराचे केंद्रबिंदू बनले आहे. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आशीर्वाद व राजकीय पाठबळाचा वापर करीत जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, मनाठा, तामसा, किनवट आदीसह अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हिमायतनगर येथे आणून येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. अशी गुप्त माहिती एका रेशन दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याने वर्तमान पत्रातून स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराचे केंद्र बनले हिमायतनगर या मथळ्याखाली वृत्त २० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले होते. त्यामुळे धान्याचा काला बाजार करणार्यांनी धास्ती घेवून चार पाच दिवस हा धान्याच्या काळ्या बाजारचा गोरखधंदा बंद केला होता.   पुन्हा सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून स्वस्त धान्याचा माल भोकरच्या मध्यमार्गाने आंध्र प्रदेशात पाठविण्यास सुरुवात केली. हि बाब भोकर पोलिस प्रशासनाला कळताच दि.२८ रोजी सापळा रचला. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाळज गावाजवळील रोडवर येताच पोलिसांनी ट्रक क्रमांक एम.एच.२६ ए डी ८५७१ ला थांबविले. तपासणी केली असता यात रेशनचा गहू आढळून आला. यावरून आरोपी (१) ट्रकचालक फारुख अली पठाण, वय 25 वर्ष (२) प्रभु कल्याणकर, रा.हिमायतनगर (3) दिगांबर देवराव पाटील, रा. भोकर यांनी शासनातर्फे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये स्वस्त धान्य दुकानात पुरवठा करण्यात येणारा माल २०० क्विटंल गव्हु किंमती ३ लाख ९६ हजार व ट्रक असा एकुण १५ लाख्स ९६ हजाराचा मुददेमालासह ताब्यात घेतला. आरोपींना ताब्यात घेतच आरोपी क्रमांक २ याने सदर गहू काळया बाजारात चढत्या भावाने विक्री करण्यासाठी तेलंगाना परराज्यात हैद्राबाद येथे आरोपी क्रमांक ०३ च्या सांगण्यावरून घेवून जात असल्याचे सांगितले. याबाबत सपोनि प्रशांत ज्ञानोबा आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादवरून भोकर पोलिस स्थानकात कलम 3, 7 जिवनावश्यक वस्तुचा कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास सपोनि आरदवाड हे करीत आहेत. मात्र सदरचा गहू खरेदी करणारा व्यापारी हिमायतनगर येथील बडा भुसार खरेदी - विक्री करणारा व राजकीय लोकांशी संबंध असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. 

काल पकडण्यात आलेल्या रेषांचा माल कोणत्या कोणत्या दुकानदाराचा होता, कोण - कोण या गोरख धंद्यात सामील आहेत. किती दुकानदारांनी अन्न सुरक्षा योजनेचे धान्य वितरीत केले, कोणत्या दुकानदाराकडे किती बोगस लाभार्थी आहेत. याचा उलगडा करण्यासाठी पकडण्यात आलेल्या धान्याच्या मुख्य मालकावर गुन्हा दाखल करावे. आणि स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराच्या रेकेटचा पर्दाफाश करून हक्काच्या धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी