चढ्या दराने विक्री..



हिमायतनगर(अनिल मादसवार)राज्य उत्पादन शुल्क किनवट विभागातील अधिकाऱ्यांच्या लालची प्रवृत्तीचा फटका तळीरामांना बसत असून, देशी आणि विदेशी दारूचे परवानाधारक दुकानातून सर्रास चढ्या दराने विक्री होत आहे. या प्रकाराकडे नांदेडचे उत्पादन शुल्क अधिकारी गणेश पाटील यांनी लक्ष देऊन हिमायतनगर भागात होत असलेल्या दुकानदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील शहरी भागात देशी दारूचे अधिकृत परवानाधारक चार दुकाने असून, दिवसभर काबाड कष्ट करणारा मजूर वर्ग हा मोठ्या प्रमाणात देशी भक्त आहे. सायंकाळी देशीच्या दुकानाकडे घोट भर घेवून चैन मिळावा असे वाटणार्या मजुरास मात्र दिवसभर कष्ट उपसून कमावलेले चार पैसे भट्टी वाल्याच्या खिश्यात घालावे लागत आहे. निव्वळ हलक्या दर्ज्याच्या देशी दारूची विक्री येथील परवानाधारक दुकानदार चढ्या दराने करत असल्याने त्याचे विपरीत परिणाम मद्यपींच्या आरोग्यावर होत असल्याचे देशीची चव घेनार्याकडून सांगितले जात आहे. 

सर्व करासहित ३३ रुपये किंमत असलेल्या एका बाटलीला माद्यापिना ४५ ते ५० रुपये मोजावे लागत असल्याने १७ ते २२ रुपयाची लुट प्रत्येकी एक बॉटल या प्रमाणे दारू विक्रेते करीत आहेत. परंतु हप्ते वसुली करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्यांना याचे काही एक देणे - घेणे नाही. मद्यपींच्या या लुटीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जणू मूक सहमती असल्यानेच दुकानदार निर्ढावले असल्याचे मद्यपि सांगतात. 

देशी दारूसह विदेशी दारू विक्रेत्यांनीही लुटीचा सपाटा चालूच ठेवला असून, १८० एम.एल.च्या बाटली मागे ५० ते ६० रुपये जादा आकारले जात असून, या संदर्भात बार चालकांकडे तक्रार केली तर दारूबंदी वाल्यांना हप्ते द्यावे लागतात असे काही बार चालक दबक्या आवाजात सांगतात. बियर शोपिमध्ये सुद्धा ग्राहकांची परवड होत असून, येतेही जादा दराने विक्री केल्या जात असल्याचे माद्यापिंकडून सांगितले जात आहे. परिणामी मद्यपींची होणारी लुट हि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच होत असल्याचे चित्र दिसून येते. 

केवळ हप्ते वसुलीसाठी तालुक्यात येणाऱ्या दारू बंदी विभागाने मात्र अवैद्य विकल्या जाणाऱ्या देशी व विदेशी दारूकडे सोयीस्करपणे पाठ फिरविल्याचे दिसून येते. येथे रुजू झालेले पोलिस निरीक्षक श्री गौतम यांनी अवैद्य देशी दारू विक्रीवर निर्बंध आणला असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र एकही ठोस कार्यवाही अवैद्य देशी -विदेशी विक्रेत्यावर केली नसल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात आजही छुप्या मार्गाने देशी दारू पोन्चविली जात असल्याचे नागरिक सांगतात. तसेच बंद काळातही येथील दुकानदाराकडून छुप्या पद्धतीने देशी व विदेशीची विक्री दुप्पट तिप्पट दराने केली जात असताना याकडे संबंधित विभागाचे क्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

उत्पादन शुल्क विभागचे अर्थपूर्ण दुर्लक्ष 
------------------------------------ 
किनवट उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.व्ही.पाटील यांच्या अंतर्गत माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, मुदखेड, व अर्धापूर हे तालुके येतात. तसेच श्री पाटील यांच्या खाली दुय्यम निरीक्षक म्हणून घोरतळे, कूळवे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरतवाड हे देखरेख व तपासणी करतात. किनवट विभागातील दुकानदारांची महिन्याला तपासणी करणे, व जादा दराने विक्री करणाऱ्या व दारूत पाणी मिसळून विकणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही करणे, वेळ प्रसंगी परवाना रद्द करण्याचे अधिकार त्यांना आहेत. परंतु संबंधित दुकानदाराकडे उत्पादन शुल्क विभागचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून दुकानदारांना अभय देत आहेत. म्हणूनच परवानाधारक दुकानदाराकडून मनमानी पद्धतीने सर्रास जादा दराने विक्री करून लुट करीत आहेत. तर ग्रामीण भागात अवैद्य रित्या छुप्या पद्धतीने पुरवठा केली जात आहे. 

या संदर्भात दारू बंदी विभागाशी संपर्क साधला असता गेल्या महिन्यात देशी दारू दुकानांची तपासणी केली असून, चारही परवाना धारक दुकानदारांना २५ ते ३० हजारचा दंड आकारण्यात आल्याचे सांगितले आहे. तीन दुकानदारांनी दंड भरला तर राजू जयस्वाल या देशी दारू विक्रेत्याने अजूनही दंड भरला नसून त्याला हि सवलत कश्यामुळे देण्यात आली हे न उलगडणारे कोडेच आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी