अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यावर वचक नाही

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील तहसील कार्यालयाचे विद्यमान तहसीलदार सुट्टीवर गेल्याने सध्याचा कारभार हा पुन्हा प्रभारीवर येवून ठेपला आहे. सदर अधिकारी सुद्धा या ठिकाणी येत नसल्याने तहसील कार्यालयात भोंगळ कारभार सुरु असल्याने अनेकांची कामे खोळंबली आहे. या प्रकाराकडे तालुक्याच्या आमदारांनी लक्ष देवून कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी आणून भरकटलेल्या तहसीलच्या कारभारास शिस्त लावावी अशी मागणी लाभार्थी, सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

५२ तालुक्याचा कारभार चालविल्या जाणार्या तहसील कार्यालयात मागील काही वर्षापासून सवल -गोंधळ सुरु आहे. या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्यालयातील व फिल्डवर राहणाऱ्या कर्मचार्यांवर वचक राहिली नसल्याने आवो..जावो घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे. गत पुढार्यांना अभायामुळे तहसील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असून, वाटेल तेंव्हा येणे व जाणे करीत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना चपला झिजवाव्या लागत आहेत. तहसील मधून चालणार्या पुरवठा विभाग, आपत्कालीन, निराधार, गौण खनिज महसूल वसुली, १०७ च्या जमानती, आअवक - जावक विभाग, यासह साज्ज्यावरील मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य विभागातील कमर्चारी मनमानी पद्धतीने वागून सामन्यांची लुट करीत असल्याच्या असंख्य तक्रारी होतच असतात. तरी देखील आजवरच्या एकही अधिकार्यांनी या कर्मचार्यांना शिस्त लावणे तर सोडाच नागरिकांच्या तक्रारीवरून साधी विचारपूस तर सोडाच स्वार्थासाठी अभय देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे जिल्हाभरात हिमायतनगर तालुक्यातील गौण खनिज, फेरफार, वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या रेशन कार्डच्या फायली, रेशन व केरोसीन वितरण, निराधारांची निवड, तक्रारी वरिष्ठांकडे न पाठविणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे, निराधारांची कामे करण्यापासून ते उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रासाठी दलालांचा सूळसुळाट यावर अंकुश ठेवण्यास तथा कामात पारदर्शकता ठेवण्याबाबत सूचना केल्या नाही. त्यामुळेच कि काय बहुतांश गोर -गरिबांची कामे प्रलंबित आहेत. तथा कामात पारदर्शकता ठेवण्याबाबत सूचना केल्या नाही. त्यामुळेच कि काय तालुक्यात रेशन, केरोसीनचा काळाबाजार, निराधार, शेतकरी, रेशन कार्ड लाभधारकांची लुट, गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन केले जात असताना आकारण्यात आलेली दंडाची रक्कम वसुली व जप्त करण्यात आलेल्या साठ्याचा लिलाव न करता चोरट्यांना रान मोकळे सोडले असल्याचा आरोप नागरीकातून व्यक्त होत आहे.

याचाच प्रत्यय दि.१९ बुधवारी येथिल तहसिल कार्यालयात आला असून, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार याच्या कार्यालयात जवळगाव साजज्चे मंडळ अधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगला होता. वरिष्ठांनी सुचविलेले काम चोखपणे पार न पडता चोरट्यांना अभय देत असल्यावरून हा प्रकार झाल्याचे समजले. याचे कारण जाणून घेतले असता समजले की मागील काही दिवसापासून अल्प प्रमाणात पाणी साठा असलेल्या पोटा तलावातून अवैद्य रित्या पाणी उपसा करणार्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु याची अंमलबजावणी केली जात नसल्यावरून या दोघात भांडण सुरु होते. यावेळी सूचना करणाऱ्या वरिष्ठ अधिकार्यास या मंडळ अधिकारी महाशयाने तर आरेरावीची भाषा वापरल्याने राजकीय वरदहस्त असलेल्या पाणी चोरट्यांना मंडळ अधिकार्याकडून अभय दिल्या जात असल्याचे समजले. हा प्रकार तहसील कार्यालयात उपस्थित झालेल्या शेकडो नागरिकांनी पहिल्याने अश्या उर्मट व कामचुकार मंडळ अधिकार्यास निलंबित करावे असा सूर नागरिकांच्या तोंडून निघत होता. कारण या महाशयाने आजवर नेमून दिलेल्या ठिकाणी महिन्यातून दोन - तीन वेळा हजेरी लावणे, उतपन्न प्रमाणपत्र, जातीच्या प्रमाणपत्र, निराधारांच्या प्रस्ताव, शेती फेर -फेरफारसाठी अनेकांची अडवणूक करून चपला झिजविण्यास भाग पडले होते असे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलून दाखविले. या मंडळ अधिकार्यावर व कार्यालयात वेळेनुसार कामात कुचराई करून अनुपस्थित राहत शुल्लक कामासाठी नागरिकांची लुट करणार्यावर तालुक्याच्या नूतन आमदार महोदयांनी शिस्त भंगाची कार्यवाही करून मुख्यालयी राहण्याचे आदेश देवून कामकाजात पारदर्शकता आणावी अशी मागणी सामान्य नागरीकातून केली जात आहे.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी