शेती फुलवली

चलम्याच्या पाण्यावर खडकाळ कोरडवाहू जमिनीवर शेती फुलवली 


हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रयत्ने वाळूचे कान रगडीता तेलही गळे या म्हणीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकर्याने शेतात वीजपुरवठा, विद्दुतपंप नसताना देखील एका बड्या शेतकऱ्याला लाजवील अश्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्टाच्या घामाने चलम्याच्या पाण्यावर खडकाळ कोरडवाहू जमिनीवर शेती फुलविली आहे. त्यांची हि जिद्द चिकाटीची मेहनत पाहून सर्व स्तरातून शेतकर्याचे कौतुक केले जात आहे. अश्या अल्पभूधार मेहनती शेतकऱ्याला शासनाने योजनांचा लाभ मिळवून देवून हातभार लावावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. 

हिमायतनगर शहरातील कालीन्का गल्लीत राहणारा गरीब शेतकरी गोपीनाथ राजाराम गुंडेवार वय ५८ वर्ष यांना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रोडवर २ एकर ११ गुंठे शेती आहे. सदर शेती हि खडकाळ व कोरडवाहू आहे. अश्या शेतीत उतपन्न काढायचे म्हणजे भल्या भल्याचे कंबरडे मोडते. मात्र कोणत्याही परिणामाची चिंता न करता या शेतकर्याने पत्नीच्या मदतीने घाम गाळून शेती कसली. सध्या बदलत्या वातावरणात शेती पिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना सर्वाप्रमाणे त्यांना सुद्धा अल्प पावसाचा फटका बसल्याने दुबार पेरणी करावी लागली. तरीदेखील हार न मानता त्यांनी कष्टाने कापूस, तूर व मिरचीचे पिक घेतले. मात्र पुन्हा निसर्गाने अवकृपा केल्याने पिकांना कसे वाचवावे या चिंतेत होता. सर्वत्र प्रयत्न केले, मात्र कोणी साथ देइन अश्या परिस्थितीत मागील काळात स्वतःच्या कष्टाने १० - १२ हाथ खोदलेल्या चालम्याच्या पद्धतीत (झरा खोदल्या प्रमाणे) असलेल्या विहिरीत पाणी आले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी विद्दुत पुरवठा आवश्यक होता, परंतु तो मिळाला नाही. म्हणून त्यांनी घरात नळासाठी वापरण्यात येणारी पावून इंच पाईप लाईन आणून २ एकर शेतात नळफिटिंग पद्धतीने फिरविली. तसेच चलम्याच्या काठावर एका लोखंडी डब्ब्याचे आळे तयार करून सदर पाईप लाईनला कनेक्शन जोडले. प्लास्टिकच्या रंगाची बकीट घेवून चलम्यातील पाणी शेंदून काढून आळ्याद्वारे ते पाणी कापूस, तूर, मिरची या पिकांना देत आहे.  


त्यामुळे आजघडीला शेतकर्याने दोन एकरात पहिल्या वेचानीत पाच कुंटल कापूस पिकविला आहे. आजही शेतातील एका एका झाडाला ३५ ते ४५ कापसाचे बोंड लागलेले असून, पुढील काळात यातून १५ ते २० कुंटल कापूस उत्पादन होईल असे त्याने प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. एवढेच नव्हे तर उर्वरित ११ गुंत्या मध्ये सदर शेतकर्याने टमाटे, बैंगन, कांदा, लसुन, मेथी, मुलगा, आदीसह अन्य प्रकारचा भाजीपाला लावून उत्पन्न काढीत आहे. 

याच्या यशाचे गमक त्याने पत्नीची साथ असल्याचे सांगून गत २० वर्षापूर्वी मिस्त्रीचे काम सोडून  १९८४ ला शेती करण्यास सुरुवात केली. शेतीत मेहनत केल्याने फळ मिळते हे लक्षात आल्यानेच आज घडीला चांगले उत्पन्न काढीत आहे. यावर ४ मुलींचे लग्न केले, गरीब परिस्थिती असताना देखील एका मुलीला शिक्षण देवून नौकरिअल लावले, एक मुलगा शिक्षण घेत असून, एक मुलगा ऑटो चालवून मला शेतीकामासाठी मदत करीत आहे. मात्र एका शेतकर्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनाचा फायदा व्हायला पाहिजे तोही होत नाही. शेतीतून निघणारे उत्पन्नावर  परिवारचा उदरनिर्वाह करतो परंतु महागाईच्या काळात तो अपुरा पडत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जर माझ्या शेतात शासनाकडून जवाहर विहीर, विद्दुत पंप, विद्दुत कनेक्शन मिळाले असते तर आज घडीला माझ्या उत्पन्नात तीन पटीने वाढ झाली असती असेही त्यांनी बोलून दाखवीत आगामी काळात शासनाच्या योजनाचा लाभ आमच्यासारख्या घाम गळणाऱ्या शेतकर्यांना मिळायला हवा अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी