दत्तक गाव एकघरीला भेट

शेतकर्यांनी विहिरी, बोअर पुनर्भरणावर भर द्यावा - कुलगुरू व्यंकटेश्वरलू 
दत्तक गाव एकघरीला भेट 
शेतकऱ्यांशी साधला मुक्त संवाद 


हिमायतनगर(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसाने महाराष्ट्रात पिक परिस्थिती अगदी बिकट आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यात तर अधिकच बिकट परिस्तिति आहे. या परिस्थितीवर मात करून आगामी काळात शेतीत चांगल्या उत्पादनासाठी शेतकर्यांनी विहिरी, बोअर पुनर्भरण करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीशील वाटचालीसाठी शेतीपूरक जोड धंद्यावर भर द्यावा असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केले. 

ते हिमायतनगर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या एकघरी गावात कापूस संशोधन केंद्र नांदेडच्या वतीने अखिल भारतीय समन्वयीत कापूस सुधार प्रकल्पाद्वारे प्रथम दर्शनी पिक प्रात्यक्षिक व आदिवासी उपाययोजनाच्या माध्यमातून दि.१२ बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षीकाना भेटी आणि निविष्ठा वाटप कार्यक्रमास उपस्थित झालेल्या शेतकर्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नांदेड कापूस संशोधक केंद्राचे प्रमुख डॉ.खिजर बेग, सहाय्यक कृषी विद्यावेत्ता प्रा.अरविंद पंडागळे, सहाय्यक विकृती शास्त्रज्ञ डॉ.पवन ढोक, सहाय्यक पैदासकार दत्तात्रेय दळवी, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी पर्यवेक्षक लाखामोड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शेतकऱ्यांची मुक्त संवाद साधून पाणी परिस्थिती, उत्पादन, शेती लागवड पद्धत, बियाणे व खतांचा उपयोग आदींसह अन्य कृषी विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच काही शेतकर्यांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या बियाणांचे वाटप हे मी महिन्यातील पहिल्या आठवड्यात देण्यात यावेत अशी मागणी केली. तर काहींनी जास्तीत जास्त शेतकर्यांना शासनाच्या बियाणांचा लाभ मिळावा त्यात अजित १५५ या बी.टी.बियाणाचा समावेश व्हावा अशी रास्त मागणी केली. तर माजी सरपंच सत्यव्रत्त ढोले यांनी तालुक्यात अजित व डॉ. ब्रन्ड सारख्या बियाणांची होत असलेल्या जादा दराच्या विक्री बाबतचा प्रश्न मांडला. 

शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर देताना त्यांनी सर्व प्रश्नाबाबत गांभीर्याने विचार करून समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच कृषी विभागाने पाणी पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देवून शेतकऱ्यांना विहिरी, बोअराचे पुनर्भरण करण्याबाबत प्रोत्साहित करावे. जास्त उत्पादनासाठी पुढील वर्षी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात बी.बी.एफ.(रुंद वरंबा सरीचे) यंत्र आणून लागवडीसाठी पर्यंत करावे. जास्त शेतकर्यांना शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती देवून त्यांच्या पर्यंत पोन्चवाव्या. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावर भर द्यावा असे सुचित केले. तर शेतकर्यांनी लागवडीपूर्वी मातीपरीक्षण करून बियाणे व खताची मागणी करावी, त्यानुसार वापर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी मंचावरून संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नानां उत्तरे देत कपाशीवरील पंढरी माशी, मावा- तुडतुडे, मिलीबग, फुलकिडे आदी कपाशीवरील रस शोषण किडीवर नियंत्रन कश्या पद्धतीने मिळवावे. आणि कापूस लागवडीपूर्वी व्यवस्थापन कसे करावे याबाबत सांगून सविस्तर माहिती असलेली पुस्तिका व कोरडवाहू बी.टी.कापूस उत्पादन तंत्रज्ञान असलेली पुस्तिका, हंड्प्रोस्पेक्ट, तसेच निविष्ठांचे वितरण करण्यात आले. 

कापूस सुधार प्रकल्पाद्वारे घेतलेल्या प्रथम दर्शनी पिकाची कुलगुरूनी केली पाहणी
-------------------------
कृषी विद्यापीठाने दत्तक घेतलेले गाव एकघरी येथे शेतकर्यांना मार्गदर्शन केल्यानंतर लगेच परिसरातील शेतकरी सुदाम सीताराम ढोले, केशव सीताराम ढोले, माधव मारोती ढोले यांनी अखिल भारतीय समन्वयीत कापूस सुधार प्रकल्पाद्वारे घेतलेल्या प्रथम दर्शनी पिक प्रात्यक्षिकाची पाहणी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केली. 

यावेळी शेतकऱ्यांशी व कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच शेतकर्यांनी आगामी काळात आणखीन जास्त कपाशीचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे सुचित करून अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कापूस संशोधक प्रमुख डॉ.खिजर बेग, सहाय्यक कृषी विद्यावेत्ता प्रा.अरविंद पंडागळे, सहाय्यक विकृती शास्त्रज्ञ डॉ.पवन ढोक, सहाय्यक पैदासकार दत्तात्रेय दळवी, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, श्री तुषार नामदे, एल.टी.शेळके, तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी पर्यवेक्षक लाखामोड, कृषी सहाय्यक डी.डी.भालेवाड, आर.व्ही सिलमवार, एन.एम.पैलवाड, बी.डी.माजळकर, ना.मा.लोखंडे, राठोड, व्ही.बी.कदम, माजी सरपंच सत्यव्रत्त ढोले, प्रकाश जाधव, पत्रकार अनिल मादसवार,धम्मपाल मुनेश्वर आदींसह शेतकरी, गावकरी, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.                                                               


   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी