चातुर्मास उत्सवास सुरुवात

शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवास सुरुवात 


हिमायतनगर(वार्ताहर)येथील शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवाला अभिषेक व सत्यानाराना महापुजेने सुरुवात कार्तिक वद्य पंचमी शके १९३६ दि. ११ मंगळवारी झाली आहे. यावेळी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्ण पाटील यांनी भेट देवून दर्शन घेतले आहे. 

शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या शिवनागनाथ मंदिरात दरवर्षी चातुर्मास वार्षिकोत्सव उत्साहाच्या वातावर्नास्त साजरा केला जातो. याची सुरुवात दि.११ मंगळवारी सकाळी ११ वाजता अभिषेक, महापूजा व सत्यनारायण पूजेने करण्यात आली. या कार्यक्रमास आ.नागेश पाटील आष्टीकर येणार होते परंतु पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनास सुरुवात झाल्याने त्यांची उणीव भासू नये म्हणून त्यांचे ची. कृष्णा नागेश पाटील यांनी उत्सवात हजेरी लावून नागनाथाचे दर्शन घेतले. यावेळी संत देवमय यांनी शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला.
    
संयोजक मोहन सातव, सदाशिव सातव, अध्यक्ष सुदर्शन पाटील यांच्या पुढाकारातून या उत्सवात चांगलीच रंगत आली आहे. मंगळवारी सायंकाळी ०७ वाजता झेंडा व लॉड जागेची पूजा, त्यानंतर  हभप कृष्णा बुवा चिखलीकर महाराज यांचे प्रवचन व संत देवमाय व नाग्नाठावर श्रद्धा असलेल्या भक्तांनी धगधगत्या निखार्यातून प्रवेश केला. रात्री महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम सुरु होता. दि. १२ बुधवारी सकाळी ८ वाजता शिवनागनाथ मंदिरातून तुळशी वृंदावन कलशासह पालखी मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. सदर मिरवणूक हि शहरातील सर्व देवी-देवतांचे दर्शन घेत पुन्हा शिव नागनाथ मंदिराजवळ परत येवून समारोप केला जाईल. त्यानंतर हभप कृष्णा बुवा चिखलीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. हा अदभूत सोहळा पाहण्यासाठी सर्व नागनाथ भक्तांनी उपस्तीत राहावे असे आवाहन संयोजकाने केले आहे.  

मंदिराचा विकास काम सुरु असून, भक्तांच्या सहकार्यातून कळसाचे काम झाले असून, सभामंडपाचे काम शिल्लक आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आ.नागेश पाटील यांनी या मंदिरास भेट देवून मंदिराचे उर्वरित विकासकाम पूर्णत्वास नेण्याचे वचन दिले होते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता देवमय व नागनाथ व तमाम जनतेच्या आशीर्वादाने मला विधानसभेत पाठविले हे   मी कदापि विसरणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी