रक्तदान शिबीर संपन्न

हिमायतनगर(वार्ताहर)रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे..म्हणून सर्वांनी तीन महिन्यातून एक वेळा रक्तदान करून राष्ट्रकार्यात भाग घ्यावा असे प्रतिपादन विहिपचे कृष्णाजी देशमुख यांनी केले. ते हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात आयोजीत रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

संपूर्ण देशात विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने व कोठारी बंधूच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून ०२ नोव्हेंबर रोजी देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथे दि.०३ सोमवारी येथील परमेश्वर मंदिरात सकाळी ११ ते ०५ च्या दरम्यान भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदरचे शिबीर हे विश्व हिंदु परीषद, बजरंग दल वाढोणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन परमपूजनीय डॉ.केशवराव हेडगेवार, छ.शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विहिपचे श्री कृष्णाजी देशमुख, महावीरचंद श्रीश्रीमाळ, लक्ष्मण शक्करगे यांच्या हस्ते झाले. यावेळी किनवट जिल्हामंत्री किरण बिच्चेवार, विजय वळसे, डाॅ.गणेश कदम, संतोष गाजेवार, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, हानुसिंग ठाकूर, राम नरवाडे, रामदास रामदिनवार, विलास वानखेडे, साईनाथ बडवे, पत्रकार प्रकाश जैन, वसंत राठोड, परमेश्वर शिंदे, धम्मा मुनेश्वर यांच्यासह अनेक नागरिक, बजरंग दल कार्यकर्ते व युवक मोठ्या संखेने उपस्थित होते. दुपारी वृत्त लिहीपर्यंत ५१ हून अधिक युवकांनी रक्दान केले होते. तसेच राष्ट्रधर्म कार्यात सहभागी होणार्या रक्तदात्यांना प्रमाण पत्राने गौरविण्यात आले.

रक्त संकलित करण्याचे कार्य नांदेड येथील जनकल्याण साखळी आणि वैद्यकीय सेवा संलग्नित श्री गुरुगोबिंदसिंहजी सेवा प्रतिष्ठान संचालित गोळवलकर रक्त पेढीतील डॉक्टर व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी बजरंगदल तालुका संयोजक गजानन चायल, शहर संयोजक कुणाल राठोड, गजु मांगुळकर, विशाल राठोड, आशिष जैन, सुधाकर चीटेवार, गोविंद शिंदे, योगेश चिलकावार, सावन डाके, विपुल दंडेवाड, मंगेश ढोणे, पापा शिंदे यांच्यासह अनेक बजरंग दल कार्यकर्त्यांनी परिसराम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी