रोकने कठीण

शिवसेना उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना रोकने कठीण - बालाजी राठोड


हिमायतनगर/ हदगाव(वार्ताहर)दूरदृष्टी असलेले शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंजावाती प्रचारामुळे विरोधकांची हवा गुल झाली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी बंजारा समाज व बहुजन टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आई तुळजाभवानी, हिंदू र्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने शिवसेनेला रोकने कठीण आहे. असे मत बंजारा टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा दुधड गणाचे पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांनी व्यक्त केले. संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थित हदगाव येथे हजारो  मनसे कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, युवा नेते नागेश पाटील आष्टीकर हे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेवून सिंचनाबाबत बोलणारे व्यक्तिमत्व आहेत. कोणत्याही पदावर नसताना त्यांनी उर्द्वा पैनगंगा प्रकालाच्या माध्यमातून कैनोल निर्मित्ती करून हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला लक्षात घेऊन लवकरच प्रशासन हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील वंचित भागात कैनोलचे प्रश्न मार्गी लागून परिसरात हरित क्रांती येईल. त्यामुळे अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढून उन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळून देण्यासाठी ठीक - ठिकाणी रस्ता रोको, आंदोलने केली, मात्र कुंभकर्णी झोपेतील काँग्रेस शासितानी पाऊस झाल्याचे कारण समोर करून हदगाव - हिमायतनगर तालुक्याला मदत मिळवून देण्यापासून वंचित ठेवले. काँग्रेसच्या नेत्यांनी विकासाच्या नावावर स्वतःचा विकास करून घेतला. अश्या ढोंगी लोकांना नेस्तोणाबूत करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नागेश पाटील यांना मतदारसंघाचा विकास करण्याची संधी देऊन धनुष्यबाणाला विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी.जी.प.सदस्य बाबुराव पाटील कोहळीकर, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंग मामा कोल्हे, डॉ. संजय पवार,   यांच्यासह हजारोच्या संखेत शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी