आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कारा

जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करीन.. आ.नागेश पाटील


हिमायतनगर(अनिल मादसवार)जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिल्याने जनतेच्या विश्वासास पात्र राहून काम करीन असे अभिवचन नवनिर्वाचित आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. ते तालुक्यातील मौजे भोंडनीतांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मंचावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम कोळीकर, डॉ.संजय पवार, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, बाबुराव कदम विरसनीकर, बंडू पाटील आष्टीकर, विवेक देशमुख, विजय वळसे, शंकर पाटील, केशव हरण, गजानन पाटील यांची उपस्थिती होती. 

मौजे दाबदारी/भोंडनीतांडा येथे दीपावली निमित्त विद्यमान पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांनी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्काराचे व दिवाळीनिमित स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी नागेश पाटील यांना फेटा, शाल-श्रीफळ व रामराव महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. आमदारांचे आगमन होतच फटक्याच्या आतीशबाजीने व ढोल तश्याच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील शिल्लक असलेला विकासाचा अनुशेष येत्या पाच वर्षाच्या काळात पूर्ण करणार आहे. ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यांना बार माही पिण्याच्या पाण्याची सोय व पक्क्या रस्त्याने जोडण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असून, सामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. शासकीय कार्यालयात जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्रथम प्राधान्य देवून शासकीय कामासाठी कोणत्याही कार्यालयात नागरिकांना खेटे मारावे लागणार नाहीत याची काळजी घेतल्या जाईल. सध्या शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असून, सरकार स्थापन होताच विधानसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यासाठी सरकारला साकडे घालणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. 


भोंडनीतांडा येथील जगदंबा मंदिर व संत सेवालाल महाराजाच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देवून प्रथम येथून विकास कामाना सुरुवात करणात असल्याचे त्यांनी सांगून नारळ फोडून भूमिपूजन केले. यावेळी एकनाथ पाटील, राजेश जाधव, लक्ष्मण जाधव, अनिल भोरे, वसंत राठोड, यांच्यासह हजारो शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी