गुटखा

गुटख्याचा गोरखधंदा तेजीत सुरु....
बंदीच्या नावाखाली होलसेल व्यापाऱ्यांची चांदी...
 


हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील काही बड्या व्यापार्यांनी गुटखा विक्रीचा धंदा तेजीत सुरु केला असून, गुटख्याचा माल रात्री - अपरात्री हिमायतनगर शहरात चोरट्या मार्गाने आणला जात आहे. या गोरखधंद्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच पोलिस(एल.सी.बी.), अन्न औषध प्रशासनाची मूक संमती मिळत असल्याने कि काय..? राजरोसपणे गुटख्याचा गोरख धंदा चालवीत असल्याचे नुकतेच नाल्यातील पाण्यात लपून ठेवलेला गुटखा दुसर्या दिवशी गायब करण्यात आल्याच्या घटनेवरून दिसून येत आहे. 

आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवर हिमायतनगर शहर वसलेले असून, गत वर्षापासून राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या व्यापार्याने गुटखा विक्रीचा गोरखधंदा पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने चालूच ठेवला आहे. या होलसेल व्यापार्याकडून शहर व ग्रामीण भागातील चिल्लर दुकानदारांना पुरवठा करीत आहेत. या व्यापारी वर्गाकडून लाखो रुपयाच्या गुटक्याची विक्री व पुरवठा केला जात असताना अध्याप अन्य औषधी प्रशासन अथवा पोलिस प्रशासनाने एकही कार्यवाही केली नाही. याबाबत उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

नुकतेच संततधार पाऊस सुरु असताना हिमायतनगर ते भोकर रस्त्यावरून गुटखा नेला जात होता, मात्र समोरून पोलिस गाडी येत असल्याने संबंधितानी नाल्यात गुटख्याने भरलेले पोते लपवून ठेवले होते. हि बाब सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी उघड डोळ्यांनी पहिली त्यामुळे याची चर्चा शहरात सुरु होती. परंतु दुसर्या दिवशी नाल्यात फेकण्यात आलेल्या गुटख्याची पोती व पैकेट संबंधितानी उचलून नेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैद्य रित्या विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. 

यात सितार, गोवा, आर.एम.डी. वजीर अन्य मसालेदार पदार्थ होते, हा माल कोणी लपविला, कोणाचा होता.. या बाबतची माहिती अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र सदरचा माल येथील बड्या व्यापार्यांकडून पाठविला जाणाराच होता अशी चर्चा नागरीकातून होत आहे. गुटख्यावर बंदी असताना हिमायतनगर शहरात गुटखा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यावर अन्न औषध प्रशासन व स्थानिकचे पोलिस निरीक्षण अनिलसिंह गौतम यांनी कार्यवाही करावी अशी मागणी गुटखा विरोधी, व्यसनमुक्ती संघटनेच्या लोकांकडून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी