नवतंत्रज्ञानाचा वापर

अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा वापर करावा - अनिलसिंह गौतम


हिमायतनगर(बी.आर.पवार)बदलत्या काळात शिक्षकांनी शैक्षणिक अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. ते शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल मधील आयोजित शिक्षक दिनानिमित्त चिमुकल्यांशी संवाद साधताना बोलत होते. दि.०५ सप्टेंबर रोजी शिक्षकाची भूमिका साकारून चिमुकल्यांनी उपस्थित माण्यावरांना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात येउन चिमुकल्यांनी संगोपनाचा संकल्प केला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित चिमुकल्यांनी शिक्षक दिनानिमित्त साकारलेल्या आपल्या भूमिकेबाद्दलचा अनुभव कथन करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून श्री गौतम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्त, अभ्यासाचे महत्व, वडिलधाऱ्यांचा आदर करून आगामी जीवनातील उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेऊन उच्च पद गाठावे असे आवाहन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना ने - आन केल्या जाणारी वाहने, वाहतुकी व रस्त्याचे नियम आदीबाबत माहिती दिली. यावेळी मंचावर नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, मोहन भैय्या, फेरोज खान युसुफ खान, शे.सलीम, संजय कवाडे, जाधव सर, गजाजन जाधव, श्री भाटे, बोरेवाड मैडम, पूजा मैडम, प्रीती मैडम, मुंढे मैडम, राठोड मैडम, सीमा मैडम, ज्योती मैडम, पगनवाड सर, माधव यमजलवाड, व शालेय कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रास्ताविकात शाळेच्या किंभर सरांनी शाळेची प्रगती व विकास यावर प्रकाश टाकला. तसेच गुरुकुल इंग्लिश स्कूलचे सचिव डॉ. मनोहर राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी